दिला शब्द केला पूर्ण अवघ्या दोन दिवसात उदापूरवासीय शेतकऱ्यांना डीपी मिळाली ; शेतकऱ्यांची तब्बल चार वर्षाची प्रतीक्षा संपली.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रम्हपूरी : ०६/०३ /२५ ब्रह्मपुरी तालुक्यातील उदापूर येथील शेतकऱ्यांची बंद असलेली डीपी बदलून मिळावी अशी मागणी गेल्या चार वर्षापासून ची उदापूर येथील शेतकऱ्यांची होती.अनेकदा निवेदने दिल्या गेले. अधिकाऱ्यांच्या भेटी गाठी होत गेल्या,परंतु शेतकऱ्यांना आवश्यक असलेली डीपी मात्र मिळत नव्हती,अशातच अनिल नाकतोडे भाजपा जेष्ठ नेते उदापूर हे आणि त्र्यंबक तुपट,मुकुंदा नाकतोडे,श्याम नाकतोडे,कुलदीप नाकतोडे,धनंजय ठेंगरी
संजय तुपट,नानू नाकतोडे या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळच दिनांक ०३ मार्च रोजी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेतृत्व,शेतकरी पुत्र, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र कार्य करणारे,माजी आमदार प्रा. अतुल भाऊ देशकर यांची भेट घेतली आणि डीपी ची समस्या सांगितली.अर्जुनजी नाकतोडे यांच्या शेताजवळील डीपी गेल्या चार वर्षापासून बंद आहे. त्यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,वाजवी उत्पन्न येत नसल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत असे कथन ऐकल्यानंतर अतुलभाऊंना शेतकऱ्यांच्या समस्येची तीव्रता लक्षात आली. आणि लगेचच डेप्युटी इंजिनियर माननीय रमेश मेश्राम साहेबांना दूरध्वनी द्वारे ही समस्या अवगत केली. डेप्युटी इंजिनिअर रमेश मेश्राम साहेबांनी देखील अतुल भाऊंच्या मागणीची ताबडतोब दखल घेऊन 100 वॅट ची डीपी दिनांक,०५ मे रोजी लावून आपले कर्तव्य पूर्ण केले.आणि भाऊंना याची माहीती दिली.
अवघ्या दोन दिवसात डीपी मिळाल्यामुळे बाधीत शेतकरी आनंदित होऊन अतुल भाऊंचे आभार मानीत आहेत.उदापूर गावात अतुलभाऊच जनतेचे खरे सेवक असल्याची चर्चा रंगत आहे.