सोमेश्वर खरकाटे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभ.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०७/०३/२५ ब्रह्मपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , अ-हेरनवरगांव येथे कार्यरत असलेले शिक्षक सोमेश्वर वासुदेव खरकाटे हे नियत वयोमानानुसार दिनांक २८ फेब्रुवारी २५ ला सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री देवानंद तुलकाने यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय सहारे,समितीच्या उपाध्यक्षा सुप्रिया ढोक, सदस्य धर्मा जराते,संजय जराते ,सोनुताई चहांदे व अन्य गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
सपत्नीक सत्कार समारंभ वेळी समिती अध्यक्ष संजय सहारे,मुख्याध्यापक तुलकाने व उपस्थितांनी साडी, शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. शिक्षक पाथोडे ,मुन, शिक्षिका गजघाटे, निकुरे , नागरे, यांनी व वर्ग तीन व चारच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून सेवानिवृत्तीनंतर चे जीवन निरोगी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.