प्रधानमंत्री टीबी मुक्त पंचायत अभियानामध्ये आर्वी तालुका टीबीमुक्त करण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे. - सुनिता मरसकोल्हे
एस.के.24 तास
वर्धा : माननीय पंतप्रधान यांचे संकल्पनेतून प्रधानमंत्री टीबी मुक्त पंचायत अभियान देशभर राबविला जात आहे त्या अनुषंगाने आरोग्य विभाग अतिशय कसोशीने प्रयत्न करत आहे . क्षयरोगामुळे दरवर्षी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे अशा लोकांचे प्राण वाचविण्यासाठी व क्षयरोग मुक्त गाव करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन आपली ग्रामपंचायत व आपले गाव क्षयमुक्त करावयाचे आहे.
असे प्रतिपादन माननीय श्रीमती सुनिता मरसकोल्हे गटविकास अधिकारी तालुका आर्वी यांनी केले सार्वजनिक आरोग्य विभाग व पंचायत समिती आर्वी यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च चे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती आर्वी येथे टीबी मुक्त ग्राम पंचायत पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व सर डॉ रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रम माननीय गटविकास अधिकारी श्रीमती सुनिता मरसकोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेंद्र वर्मा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात दिनांक 26 मार्च 2025 रोजी संपन्न झाला.यापूर्वी सन 2023 2024 मध्ये तालुक्यातील फक्त पाच ग्राम पंचायती टीबी मुक्त झालेल्या होत्या याच धरतीवर यावर्षी सुद्धा केंद्र शासनाने सदर अभियान राबविण्याचे सूचना केलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने आर्वी तालुक्यामध्ये आरोग्य विभागामार्फत टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान यशस्वीपणे राबवून आर्वी तालुक्यातील एकूण 29 ग्रामपंचायत टीबी मुक्त करण्यात आलेल्या आहेत यापुढे तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत टीबी मुक्त करण्याच्या आरोग्य विभागाचा मानस आहे आज रोजी घेण्यात आलेल्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमामध्ये आर्वी तालुक्यातील पात्र 29 ग्रामपंचायतीमधील माननीय सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी आवर्जून सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये माननीय डॉ. निलेंद्र वर्मा तालुका आरोग्य अधिकारी यांनी जास्तीत जास्त क्षयरोग संशयित रुग्णांची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.तसेच अध्यक्षीय भाषणात माननीय गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे यांनी संपूर्ण पंचायतराज विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री टीबी मुक्त पंचायत अभियानामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव खरांगणा रोहना येथील वैद्यकीय अधिकारी समुदायिक आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य सेवक आशा स्वयंसेविका यांची कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमांमध्ये एकूण पात्र 29 ग्रामपंचायतींना माननीय श्रीमती सुनिता मरसकोल्हे गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्वी व माननीय डॉ.निलेंद्र वर्मा तालुका आरोग्य अधिकारी आर्वी यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शितल माकोडे, तालुका समूह संघटक यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री राजेंद्र खडगी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री अविनाश चव्हाण आरोग्य सहाय्यक श्री राजेंद्र खडगी क्षयरोग पर्यवेक्षक श्री गिरीधर गंगाळ क्षयरोग पर्यवेक्षक श्री महेंद्र करंगळे कुष्ठरोग पर्यवेक्षक श्री राजेश जाधव आरोग्य पर्यवेक्षक कुमारी पल्लवी बुटले कुमारी पल्लवी उईके व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.