कुर्झा येथील भूती नाल्यावरील उडणाऱ्या मातीच्या धुळाने प्रवासी त्रस्त. ★ सार्वजनिक बांधकाम अभियंता चहांदे म्हणतात हा मातीचा धूळ नसून राईस मिलचा धूळ आहे.

कुर्झा येथील भूती नाल्यावरील उडणाऱ्या मातीच्या धुळाने प्रवासी त्रस्त.

  

सार्वजनिक बांधकाम अभियंता चहांदे म्हणतात हा मातीचा धूळ नसून राईस मिलचा धूळ आहे.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,०७/०३/२५ ब्रह्मपुरी  ते अ-हेरनवरगांव या रोडवरील कुर्झा भूतीनाल्यावर नुकतेच नवीन पुलाचे बांधकामांचे  खोदकाम सुरू झाले आहे.पिंपळगाव (भोसले),अ-हेरनवरगांव,भालेश्वर,नांदगाव (जाणी) या गावातील आणि बाहेरगाव वरून ये - जा करणाऱ्यांसाठी वाहनधारकांसाठी तात्पुरती जाणे येण्याची व्यवस्था नाल्यामध्ये पाईप टाकून कच्चा रपटा तयार  करण्यात आला आहे.

सदर रस्त्यावरती माती टाकून डागडुजी करण्यात आली.या रस्त्यावरून अवजड वाहनापासून ते फोर व्हीलर,टू व्हीलर,सायकल धारक शालेय विद्यार्थी, ये जा करीत असतात.तात्पुरती मातीची डागडुजी केली असल्यामुळे वाहनधारकांना मातीच्या उडणाऱ्या धुळाचा कमालीचा त्रास होतो. प्रसंगी डोळ्यात धुळ गेल्यामुळे  रप्ट्यावरतीच वाहन थांबवून डोळे साफ करावे लागतात.सायंकाळच्या वेळेस या रप्ट्यावरून पुढचे दिसेनासे उडणाऱ्या धुळा मुळे खूप अस्पष्टपणे दिसत असते त्यामुळे वाहन धारकाचे वाहन रस्त्याला संरक्षण कठळे ( टीन )नसल्यामुळे नाल्यात पडून मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


या रप्ट्यावरून  ऊडणाऱ्या धुळावर पाणी मारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ब्रह्मपुरी चे अभियंता चहांदे यांना विचारणा केली असता म्हणतात की, हा मातीचा धूळ नसून नाल्याजवळ असलेल्या राईस मिलचा आहे.रप्ट्यावरती पाणी मारणे अशक्य आहे असे उडवा ऊडविचे उत्तर दिले.यांच्या या वक्तव्यावरून ते जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळतात की काय असे वाटते.

कुर्झा नाला रपट्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या  प्रवाशांना मातीच्या उडणाऱ्या धुळापासून त्रास होणार नाही,प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची दखल संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग ब्रह्मपुरी यांनी घ्यावी अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे.

तसे न झाल्यास आंदोलना सारखे शस्त्र हातात घ्यावे लागेल.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !