भौतिकशास्त्रात हिमांशू कोतरंगे " आय.आय.टी.जाम " परीक्षा उत्तीर्ण
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील बी.एस्सी तृतीय वर्षातील हिमांशू कोतरंगे विद्यार्थ्याने अत्यंत प्रतिष्ठेची 'आय.आय.टी जाम २०२५' ही परीक्षा भौतीकशास्त्रात यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे, त्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.
हिमांशू कोतरंगेंनी भौतिकशास्त्रात उत्कृष्ट गुण मिळवून ते आता एम.एस्सी.भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी त्यांनी पात्रता मिळवली आहे.
त्या विद्यार्थ्यांची ही यशस्वी वाटचाल म्हणजे त्यांच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. कठीण परिस्थिती असूनही, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण केली.
ही खरोखरच उल्लेखनीय बाब आहे.या यशाबद्दल एन.बी.एच. सोसायटीचे सचिव श्री अशोकजी भैया,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एच. गहाणे आणि उपप्राचार्य डॉ.एस.एम.शेकोकर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून विभागप्रमुख डाॅ रतन मेश्राम , प्रा दलेश परशुरामकर व डॉ. अतुल येरपुडे,रोशन डांगे, विलास खोब्रागडेंनी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले होते. सर्वांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.