ब्रम्हपुरी तालुक्यातील उचली गावाजवळ गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या
अमरदीप लोखंडे : सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,03/03/2025 ब्रम्हपुरी तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उचली गावाजवळील स्मशान भूमीजवळ उभ्याअसलेल्या मोठ्या इलेक्ट्रिक लाईनच्या टॉवरच्या आडव्या पोलला प्रेमी युगलानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक,02 मार्चला उघडकीस आली.
सदर आत्महत्या ही एक दिवसा अगोदर केली असल्याचे बोलल्या जात आहे.आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव रोहित रमेश लिंगायत वय,25 वर्ष राहणार उचली व चांदली येथील मुलगी गायत्री उर्फ सोनू अनिल गणवीर वय,14 वर्ष यांनी प्रेम प्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
आत्महत्या करतांना त्यांनी मोटार सायकलचा वापर केल्याचे दिसत आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.ब्रम्हपुरी पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी दोन्ही प्रेत ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले.पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.