राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम गडचिरोली तर्फे श्रीमती शैलानी विरेंन्द्र बारसिंगे (आशा वर्कर) उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित.
एस.के.24 तास ! मुख्य संपादक
गडाचिरोली : दिनांक,24/03/2025 ला जागतिक क्षयरोग दिनांनिमित्त राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम गडचिरोली तर्फे श्रीमती, शैलानी शैलानी विरेंन्द्र बारसिंगे (आशा वर्कर) यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शिल्ड प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
" होय,आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो " " टी.बी. हारेल,देश जिंकेल "
सर्वांनी प्रतिज्ञा केले.
पुढील भविष्यातील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,सुहास गाडे,जिल्हा क्षयरोग अधिकारी,डी. आर.सी.एच.ओ.डॉ.हुलके व कर्मचारी वर्ग आशा वर्कर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते.