आर्वी येथे मोठ्या उत्साहात आशा दिवस कार्यक्रम साजरा.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक,22/03/2025 ला महेश्वरी मंगल कार्यालय आर्वी येथे मा.तालुका आरोग्य अधिकारी नीलेंद्र वर्मा सर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात आशा दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरून मा.दिपाली चांडोळे मॅडम M&E स्मिता वासनिक मॅडम, Rks cordinator अन्नपूर्णा ढोबळे मॅडम यांची उपस्थिती होती.
सर्व प्रा.आ.केंद्र अंतर्गत वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी आरोग्य सहायक आरोग्य सहाय्यिका शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथील सर्व अधिकारी कर्मचारी सर्व गट प्रवर्तक व आशा ताई उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात आशा स्वयंसेविका यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पुष्परचना स्पर्धा ,टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोषण आहार स्पर्धा ,नृत्य स्पर्धा, चे आयोजन करण्यात आले होते.उत्कृष्ठ काम करणाऱ्या आशा ताई व गट प्रवर्तक यांचा सत्कार करण्यात आला.तसेच स्पर्धेत विजयी आशा ताईंचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कू.शिल्पा बुरघाटे व उज्ज्वला खांडेकर यांनी केले. व आभार प्रदर्शन BCM कु. शितल माकोडे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील सर्व कर्मचारी व गट प्रवर्तक यांनी सहकार्य केले.