चंद्रपूर येथील एमआयडीसीतील लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीला भीषण आग.

चंद्रपूर येथील एमआयडीसीतील लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीला भीषण आग.


एस.के.24 तास


चंद्रपूर : येथील एमआयडीसीतील लक्की पेट्रोलियम या ऑईल तयार करणाऱ्या कारखान्यात दुपारी बारा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.यात लाखोंचे ऑईल जळाले. या आगीच्या ज्वाळा बाजूच्या बदकी इंडस्ट्री या मिनरल वॉटर तयार करणाऱ्या कारखाण्यापर्यंत पोहचल्या.त्यामुळे बदकी इंडस्ट्रीजचे देखील लाखोंचे आर्थिक नुकसान झाले. लक्की पेट्रोलियम हा कारखाना आगीत स्वाह झाला.

कंपनीत खराब ऑईलवर प्रक्रिया करून नवीन ऑईल तयार केले जाते आणि खुल्या बाजारात विक्री केले जाते. सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. 

कडक उन्हात या आगीच्या ज्वाळांनी पेट घेण्यास सुरूवात केली.लकी पेट्रोलियम कंपनीत खराब ऑईलचे ड्रम होते. या ड्रमला आगीने कवेत घेतल्याने आगीचा भडका उडाला.आकाशात आगीच्या ज्वाळा व धुर दूरपर्यंत दिसत होता. त्यातच आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड, काड्या आणि रद्दी पेपरचे गठ्ठे होते. 

त्यामुळे आग चांगलीच भडकली. या आगीने आजूबाजूचा परिसर देखील कवेत घेण्यास सुरूवात केली. बाजूलाच बदकी इंडस्ट्रीज ही मिनरल वॉटर तयार करणारी कंपनी आहे. आगीच्या ज्वाळांनी या कंपनीला देखील कवेत घेतले. त्यामुळे बदली इंडस्ट्रीजचे देखील लाखोंचे आर्थिक नुकसान झाले.

दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही.आगीची माहिती मिळताच चंद्रपूर महापालिका, घुग्घुस तसेच एमआयडीसी येथून अग्नीशमन दल पाचारण करण्यात आले व आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. कारखन्याचे संचालक गुजरात येथे वास्तव्याला असल्याचे सांगण्यात आले. 

हा कारखाना व्यवस्थापक व कामगार यांच्याच भरोशावर सुरू होता.दरम्यान या घटनेनंतर एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !