ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव जाणी येथील शेतकरी गोवर्धन पांडुरंग डांगे वाघाच्या हल्ल्यात जखमी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,१६/०३/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव जाणी येथील रहिवासी शेतकरी गोवर्धन पांडुरंग डांगे हे आपल्या शेतावर वैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या शेतशिवारात आज सकाळी ७.३० वाजता धानाला पाणी देण्यासाठी मोटर पंप सुरू करण्यास गेले असता मोटर सायकल स्टैंड वर लावत नाही तोच रस्त्यालगत तोडलेल्या आंब्याच्या बुडाजवळ दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.
यात दोघांची झटापट झाली. झटापटीत ते जखमी झाले आणि त्याला सोडून वाघ मोठ्या नहराने भालेश्वरच्या दिशेने पळून गेला.जखमीला सरकारी दवाखाना उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे.
सध्या एक वाघीण व दोन पिल्ले पिंपळगाव, अ-हेरनवरगांव,भालेश्वर,नांदगाव जाणी या नदीकिनारी परिसरात फेरफटका मारीत असतात अशी परिसरातील जनतेत चर्चा आहे.वनविभाग अधिकारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन भालेश्वरच्या दिशेने पळालेल्या वाघाचा शोध घेत आहेत.