श्री.अमरदीप लोखंडे यांच्या लेखणीतून...
!! नारी तुझा सन्मान !!
सवय झाली तुला
अपार कष्ट झेलण्याची
अनंत दुःख सहन खाऊन
स्वीकारते जबाबदारी पेलण्याची....
किती तुझ्या बहुरंगी भूमिका
माता, भगिनी, प्रेयसी,अर्धांगिनी
शांत, निरागस, कोमल,चेहरा
प्रसंगात तू रणरागिनी....
जबाबदारीचे ओझे वाहून
अर्धपोटी दोन घासात
कधी साहेब दासत्व्य पेलून
कोंडमारा कोंडून श्वासात.....
प्रेमाचे दोन घास तुझे
प्राणीमात्रास संजीवनी
एवढे उपकार थोर माऊले
पापी वासना नर नयनी.....
जेवढे गुण तुझे गावे
पाण्याहून पवित्र सारे
राजमाता, सावित्रीची तू कल्पना
तुटली बेडी मोकळी बंदिस्त दारे....
नारी तुझा सन्मान तेव्हा
राजगादीचा मिळेल राज
सन्मानाने जगा निर्भय
लक्ष्मीबाई चा करुनी साज
लक्ष्मीबाईचा करुनी साज....
---------------------------------
श्री.अमरदीप प्रल्हाद लोखंडे अ-हेरनवरगांव ब्रह्मपुरी जिल्हा - चंद्रपुर - ८३०८००५८६८