स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. - प्राचार्य डॉ.देवेश कांबळे

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. - प्राचार्य डॉ.देवेश कांबळे 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,१०/०३/२५ भारतात स्त्री शिक्षणाची खरी सुरुवात सावित्रीबाई फुले यांनीच केली.त्यांच्या कार्यामुळेच आज स्त्रिया शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रांत उंच भरारी घेत आहेत असे विधान प्राचार्य डॉ देवेश कांबळे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२८ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात केले. 

        

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ देवेश कांबळे पुढे म्हणाले की खरे समाजसुधारक हे फुले दांपत्यच होते.कारण इतर स्वयंभू समाजसुधारकाप्रमाणे त्यांनी समाजाच्या दोष आणि व्याधीवर नुसती वरवरची मलमपट्टी केली नाही तर  तर्कनिष्ठ- विज्ञानवादी विचाराने शस्त्रक्रियाच केली. 

           

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.स्निग्धा कांबळे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सखोल आढावा घेऊन  स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांचे दुर्लक्षिले गेलेले साहित्यिक व्यक्तिमत्व यावर सविस्तर प्रकाश टाकला. 

           

कार्यक्रमाचे संचालन तथा आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !