8 मार्च जागतिक महिला दिवस निमित्ताने...
सौ.जानवी अमिर गेडाम (कंचावार) यांच्या लेखणीतून...
!! स्त्रियांचे जीवन !!
एस.के.24 तास
किती जपून - छपून आम्ही चालावं स्त्रियांन सहन करुनी किती - अत्याचार जन्माला आलोत मुली म्हणून काय आम्ही झालोत लाचार...
मिळे उन्हात आईचा पदर - आम्हा मुलींना समजून घेण्यास,सर्व लोक देतात नकार...
या समाजाला नाही हो - आम्हा मुलींची कदर झाली मुलींची लग्नाची वय - आई - बाबा करतात कन्यादान...
त्यांचा राखण्यास अभिमान - आम्ही राहतो त्यांच्यात समाधान - जाऊन सासरी मिळते मान अपमान
सहन करावा किती सहन करावा - आम्हा स्त्रियांनी अत्याचार आता - हॆ खूप झालं हॆ सारं तू आणखी किती,झेलतेस भार...
तू सावित्री,तूच झाशी गं - तू रडायचं नाही तर तू लढायचा गं - नारी तू घे उंच गगणात उंच भरारी जिम्मेदारी संग - नारी भर रहि है उडान...
- सौ.जानवी अमिर गेडाम (कंचावार) मु.पो.चूरचुरा माल ता.जि - गडचिरोली