जागतिक महिला दिनी गडचिरोली पोलीस दलामार्फत प्रोजेक्ट उडान अंतर्गत “ महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ ” संपन्न.
★ कार्यक्रम प्रसंगी 54 मीनी ट्रॅक्टर, 10 थ्रेशर मशिन व स्प्रे पंपांचे वाटप.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रातील शेतकयांची आर्थिक उन्नती व्हावी व गडचिरोली जिल्हयातील शेतकयांचे जीवनमान उंचवावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दल, समाज कल्याण विभाग, गडचिरोली व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ दि. 08/03/2025 रोजी एकलव्य सभागृह व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील कवायत मैदान येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाकरीता गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम अतिदुर्गम भागातील 54 बचत गटांच्या 500 हून अधिक महिला लाभार्थी उपस्थित होत्या. यावेळी 54 बचत गटांना मीनी ट्रॅक्टर, 10 बचत गटांना थ्रेशर मशिन व इतर बचत गटांना स्प्रे पंप या कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. जिल्हयातील शेतकयांना तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा या करीता कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यत 9,39,449 नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे.
यामध्ये प्रोजेक्ट कृषी समृध्दी अंतर्गत 16,503 शेतकयांना कृषी बियाणे वाटप, 5540 शेतकयांना भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, शेळी पालन इ. प्रशिक्षण व साहित्य देऊन रोजगार व स्वयंरोजगाराकरीता आत्मनिर्भर करण्यात आले आहे.
तसेच 176 शेतकयंाना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे व 16 कृषीदर्शन सहलींमधून 738 शेतकयांना आधुनिक शेतीची माहीती मिळवून देण्यात आली आहे. यापुर्वीसुध्दा विविध मेळावे व उपक्रमांच्या मध्यमातून महिला बचत गटांना आतापर्यंत 52 थ्रेशर मशीन, 38 झिरो ट्रिल ड्रिल, 15 भात रोवणी यंत्र, 43 पॉवर विडर इ. साहित्य वाटप करण्यात आले आहे.
तसेच विशेषत: महिलांकरिता घेण्यात आलेल्या प्रशिक्षणांच्या माध्यमातून एकुण 6020 महिलांना आत्मनिर्भर बनविण्यात आलेले आहे. यामध्ये नर्सिंग, जनरल ड¬ुटी असिस्टंट, हॉस्पीटॅलीटी, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण यामाध्यमातून एकूण 2,905 महिलांना नोकरी विषयक प्रशिक्षण, तसेच एकुण 2,907 महिलांना फास्टफुड, ब्युटी पार्लर, भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, सॉफ्ट टॉइज, इ. प्रकारचे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासोबतच दुर्गम भागातील 208 युवतींना कराटे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक, श्री. नीलोत्पल यांनी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व सांगितले की, “गडचिरोली जिल्हयातील माओवादग्रस्त आदिवासी भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिलांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने अवजारे वाटप करण्यात येत आहेत.
सर्व भगिनींनी आपल्या मुलींना चांगले शिक्षण द्यावे व स्वत:मध्ये असलेली शक्ती समजून घेऊन स्त्री अत्याचारापासून मुक्तता मिळवावी.” तसेच जिल्हाधिकारी गडचिरोली,श्री. अविश्यांत पंडा, यांनी सांगितले की, “ गडचिरोली जिल्हा प्रशासन जिल्हयातील शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा याकरीता प्रयत्न करीत आहे.
याकरीता शासनाचे विविध विभाग आपसामध्ये समन्वय राखून काम करीत आहेत.” तसेच यावेळी त्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणाया पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व प्रोजेक्ट उडानच्या कार्याची प्रशंसा देखील केली.
सदर कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी,गडचिरोली श्री.अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. व्हि. सत्यसाई कार्तिक, समाज कल्याण विभाग गडचिरोली व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे अधिकारी तसेच गडचिरोेली पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमके तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.