पत्नी कडून तलाठी पतीचा मानसिक छळ ; व्हॉटसॲप " वर स्टेटस ठेऊन पतीने संपवले जीवन. 📍5 दिवस झाले,जेवण केलेलं नाही.माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल.

1 minute read

पत्नी कडून तलाठी पतीचा मानसिक छळव्हॉटसॲप " वर  स्टेटस ठेऊन पतीने संपवले जीवन.


📍5 दिवस झाले,जेवण केलेलं नाही.माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल. 


एस.के.24 तास 


अकोला : पत्नीकडून पतीचा मानसिक व आर्थिक प्रचंड छळ करण्यात आला.त्याला कंटाळून पाच दिवसांपासून उपाशी पतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.मोबाइलवर स्टेटस ठेऊन आत्महत्येसाठी पत्नीला जबाबदार धरले.


मृत्यूनंतर माझा चेहरा सुद्धा पत्नीला दाखवू नका,असे त्यामध्ये नमूद आहे.शीलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते तेल्हारा तहसील कार्यालयांत तलाठी म्हणून कार्यरत होते.

तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी " व्हॉटसॲप " वर एक स्टेटस ठेवले.त्यामधून तेलगोटे यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले. शिलानंद तेलगोटे यांनी मृत्यू पूर्वीच्या या स्टेटसम ध्ये पत्नी आपला मानसिक छळ करते. मृत्यूनंतर चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये,असेही नमूद केले. पोलिसांनी तेलगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

तेलगोटे यांनी " व्हॉटसॲप स्टेटस " मध्ये पत्नीने आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केले होते.यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केल्याची माहिती आहे.या घटनेवरून परिसरत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत्यूपूर्वीच्या " व्हॉट्सअप "वर स्टेटसमध्ये नेमकं काय ?

मी श्री.शिलानंद माणिकराव तेलगोटे वय, 39 रा.तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा.मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते.

आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती.सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे.कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे. 

माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं पोस्टमार्टेम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये.कारण आज मी पाच दिवस झाले,जेवण केलेलं नाही.माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !