नागपुरातून हैद्राबादमध्ये कत्तलीसाठी जनावरांची तस्करी ; कंटेनरसह 3 मोबाईल, 60 बैल असा एकूण 45 लाख 5 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त.
एस.के.24 तास
यवतमाळ : राज्यात गो हत्या बंदी कायदा असतानाही राजरोसपणे गोवंशाची तस्करी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील सीमावर्ती भागात जनावरांची अवैध वाहतूक दररोज होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाने कंटेनरमध्ये जनावरे कोंबून हैद्राबाद येथे नेले जात असताना कंटेनर पकडले. या कंटेनरमधून तब्बल 60 गोवंशाची अवैध वाहतूक केली जात होती.
या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, जनावरांची सुटका करण्यात आली.पोलिसांनी कंटेनरसह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी संतोष भरलाल लोधा वय,59 वर्ष रा.फुलपुरा ता.सारंगपूर जि. राजगड, मध्यप्रदेश),मशीद अली रशीद अली वय,28 वर्ष, शाकीर अली अमानत अली वय,50 वर्ष दोघेही रा. दांडीयावाडी ता.सारंगपूर जि.राजगड,मध्यप्रदेश या आरोपींना अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदे तसेच व इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पेट्रोलींग करीत होते.
अशातच एका कंटनेर वाहनातून गोवंशीय बैल कत्तलीकरीता पांढरकवडा मार्गे हैद्राबाद येथे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासह पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी गावजावळ सापळा रचला.तेव्हा एक कंटेनर नागपूरकडून येताना दिसताच त्याला थांबविले.
वाहनातील व्यक्तींना विचारपूस केली असातना,त्यांनी वाहनात 60 गोवंशीय बैल असल्याचे व ते कत्तलीकरीता हैद्राबाद येथे नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी करुन वाहनातील संतोष लोधा, मशीद अली रशीद अली, शाकीर अली अमानत अली या तिघांना ताब्यात घेतले.
कंटेनरसह 3 मोबाईल, 6 बैल असा एकूण 45 लाख पाच हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी आरोपींविरुध्द पांढरकवडा पोलीस ठाण्यात प्राणी क्रुरता प्रतिबंधित अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्ष सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, उपनिरीक्षक धनराज हाके, सुनिल खंडागळे, उल्हास कुरकुटे,सुधीर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सतिश फुके यांनी केली.