चंद्रपूर मार्गावरील अंधारी नदीजवळ जानाळा येथील दुचाकी अपघातात 2 सख्या भावांचा मृत्यू.
एस.के.24 तास
मुल : चंद्रपूर येथे दुचाकीने नागपूरला जाण्यासाठी लहान भावाला मोठ्या भावाने सोडून देत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदारा धडक दिली.यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर मार्गावरील अंधारी नदीजवळ शुक्रवारी (दि.21) पहाटे 5 :00 वा सुमारास घडली. शुभम राजू आकुलवार वय,24 वर्ष व करण राजू आकुलवार वय,20 वर्ष रा. जानाळा असे अपघातात ठार झालेल्या 2 सख्या भावांची नावे आहेत.
मुल तालुक्यातील जानाळा येथे पसरली शोककळा : -
मुल तालुक्यातील मौजा जानाळा येथील आकुलवार कुटुंबीयातील दोन सख्या भावाचा अपघातात मृत्यू झाल्याने जानाळा येथे शोककळा पसरली आहे. करण हा अभियंता म्हणुन आजच तो नागपूर येथे रूजू होणार होता.मात्र नियतीला हे मान्य नसावे.
मुल तालुक्यातील जानाळा येथील शुभम व करण हे होन्डा फॅशन प्लसन क्रं. MH.34 U 1987 ने चंद्रपूरकडे जात होते.दरम्यान अंधारी नदीजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली, यात ते दोघेही जागीच ठार झाले. मृतकांना चंद्रपूर येथील सामान्यरुग्णालयात शवविच्छेदन करिता नेण्यात आले असून शव नातेवाहिकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मुल पोलिस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विविध गुन्हा दाखल केला आहे.