सोशल मीडियावर दंगली संदर्भात आक्षेपार्ह मजकूर किंवा व्हिडिओ तुम्ही तर दंगली संदर्भात कुठली पोस्ट केली नाही ना… ★ सोशल मीडियावरील 272 अकाऊंट धारकांवर गुन्हे दाखल.

सोशल मीडियावर दंगली संदर्भात आक्षेपार्ह मजकूर किंवा व्हिडिओ तुम्ही तर दंगली संदर्भात कुठली पोस्ट केली नाही ना…


★ सोशल मीडियावरील 272 अकाऊंट धारकांवर गुन्हे दाखल.


एस.के.24 तास


नागपूर : नागपूरमध्ये महाल भागात  दंगल उसळली झाली. या काळात आणि नंतरही अनेक जण सोशल मीडियावरुन पोस्ट  करीत आहेत. मात्र, भावनिक होऊन फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर आणि अन्य सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करु नका. कारण, शहरात उसळलेल्या दंगल काळात चिथावणीखोर मजकूर, फोटो, व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या 272 सोशल मीडियावरिल हँडल वापरणाऱ्यांवर नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

सायबर पोलिसांनी दंगलकाळात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांचा शोध घेणे सुरु केले असून आतापर्यंत 50 अकाऊंटधारकांची जणांची ओळख पटली असून त्यांना पोलीस ताब्यात घेणार आहेत.दंगल भडकवण्यासाठी कारणीभूत असलेल्या जवळपास तीनशेवर सोशल मीडिया अकाउंटची तपासणी केली. 

यामध्ये 172 अकाउंटवर आक्षपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ आढळून आले. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या 40 टक्के व्हिडिओ आणि फोटो सायबर पोलिसांनी डिलीट केले आहेत.सोशल मीडियावर दंगली संदर्भात आक्षेपार्ह मजकूर किंवा व्हिडिओ टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दंगली घडण्याच्या पूर्वीपासूनच पोलिसांनी काही सोशल मीडियावरील पोस्ट तपासल्या आहेत. सायबर गुन्हे शाखेतील चार पोलीस अधिकारी आणि 20 पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक सोशल मीडियावरील पोस्ट तपासणी करीत आहेत.दंगली संदर्भात किंवा दंगल उसळण्यासाठी कारणीभूत ठरणारे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

गेल्या पाच दिवसात सायबर पोलिसांनी जवळपास 300 पेक्षा जास्त सोशल मीडिया अकाऊंट तपासले. त्यावर हिंदू आणि मुस्लीम दंगल भडकविण्यास प्रोत्साहन मिळण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पोस्ट आहेत. 

त्यात दंगलीचे व्हिडिओ आणि फोटो,पोलिसांवर दगडफेक होत असतानाचे फोटो आणि त्याखाली असलेला आक्षेपार्ह मजकूर, याबाबत पोलिसांनी गंभीर भूमिका घेतली आहे.सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे जवळपास 50 जणांची ओळख पटली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन ताब्यात घेण्यात येणार आहे.

दंगलीस प्रोत्साहन देणारे अडचणीत शहरातील आणि शहराबाहेरील फेसबुक,इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दंगलीस प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट आहेत.बांगलादेश लिहून असलेल्या फेसबुक पेजवरुनही दंगलीसाठी प्रोत्साहन देणारा काही आक्षेपार्ह मजूर आढळून आला आहे.


त्यामुळे बांगलादेशचे नाव नागपूर दंगलीशी जुळले आहे. तसेच काही दंगल घडवून आणण्यास कारणीभूत ठरणारे पोस्टही सोशल मीडियावर पोलिसांना आढळून आल्या आहेत.त्यावरही पोलीस कारवाई करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !