तब्बल 25 वर्षांनी रंगला आठवणींचा स्नेहमिलन सोहळा एकत्र येऊन दिले मदतीचे आश्वासन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२५/०३/२५ आयुष्याच्या वळणावर जगत असतांना काय कमवलं नि काय गमवलं याचा तंतोतंत उदाहरण म्हणजे हा आठवणींचा स्नेहमिलन सोहळा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, ब्रम्हपुरी येथे सन १९९९ - २००० च्या १० वी बॅचने तब्बल २५ वर्षानंतर आपल्या शिकत असतानाच्या पुर्वीच्या आठवणींना उजाळा देणारा, मैत्रीचा स्नेहमिलन सोहळा पार पाडुन एक आदर्श निर्माण केला. या सोहळ्यादरम्यान सर्व मित्र- मैत्रिणींनी एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंत या म्हणीप्रमाणे अडीअडचणींच्या वेळी एकमेकांना मदत व साथ देण्याचा निर्धार केला.
यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करुन आपापल्या व्यथा तथा आनंद व्यक्त केला. आपापल्या सुप्त गुणांचे सादरीकरण करुन सुरुची भोजनाच्या माध्यमातुन आपण तेव्हाच्याच वयातील मित्र आहोत याची प्रचिती दिली.या उपस्थित मित्रांच्या यादित कोणी नोकरीला, व्यवसाय, राजकीय ,सामाजिक तर कोणी शेतकरी आहेत.
मात्र या सोहळ्याच्या माध्यमातुन प्रत्येकाची परिस्थिती व समस्या जाणुन घेऊन सामाजिक दृष्टीकोन बाळगुन भविष्यात एकमेकांच्या आधाराची मोट बांधल्या गेली. ब्रम्हपुरी पासुन ०३ किमी अंतरावर असलेल्या दुधवाही येथील निसर्गरम्य वातावरणातील फार्म हाऊस वर हे आयोजन करण्यात आले. २५ वर्षा पुर्वीच्या १० वी तील आठवणींना उजाळा देण्यासाठी सुरुवातीला व्हाट्सअप ग्रुप बनविण्यात येऊन सर्व क्लासमेट्स यांना एकसंघ बांधण्यात आले व त्यानुसार सर्व नियोजन आखण्यात आले.
या स्नेहमिलन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी केशिप पाटील व लिलाधर वंजारी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे तसेच आशिष नागदेवते, अमोल बागडे, राकेश फुलझेले, वैशाली ठवरे, सुभाष बनकर, नरेश लोखंडे यांनी मोलाचे सहकार्य केले.शिवाय शरद बोरकर, सरोज मेंढे, गिरीधर गणवीर, प्रतिपाल हुमणे, चोखेश्वर रामटेके, राजेश लोणारे, धनपाल शेंडे, रविकांत राऊत, कैलास ढोक, भाग्यवंत लोणारे
क्रिष्णा वैद्य,विकास सांगोळकर, भागवत पचारे, सुरेश कोराम, शिल्पा बागडे, अर्चना मेश्राम, शुभांगी मेश्राम, दिक्षा रामटेके, रुपाली सैजारे, प्रमिला लोखंडे, सुजाता रामटेके, मुनेश्वर देवगडे, कृष्णकांत भागडकर, रजनीकांत कांबळे, रॉकेश कुरझेकर, सुरज रामटेके, मुन्ना बोरकर, धम्मा बनकर, राजेश रामटेके, राष्ट्रपाल मेश्राम आदिंनी सहभाग घेऊन स्नेहमिलन सोहळा पार पाडला.