शिवणी येथील तरुणीला मारहाण करुन अत्याचार करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली शिताफिने अटक
★ पिडीतेच्या बयाणानंतर आरोपीला केले 24 तासाच्या आत अटक
एस.के.24 तास
गडचिरोली : दि.04/03/2025 सविस्तर वृत्त असे आहे की,गडचिरोली-चामोर्शी मार्गावर असलेल्या मौजा शिवणी येथील तरुणी दिनांक 02 मार्च 2025 रोजी सायंकाळी 05.30 वा.चे सुमारास गावाबाहेर शौचास गेली असताना, अज्ञात आरोपीकडून सदर तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत तरुणीला निर्दयीपणे मारहाण करुन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली होती.
तरुणी बऱ्यावेळा नंतरही घरी न आल्याने नातेवाईकांनी तरुणीचा शोध घेतला असता,ती गावाबाहेरील परिसरात बेशुद्ध स्थितीत आढळून आली होती.तरुणीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते.गडचिरोली येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दिनांक,03 मार्च 2025 रोजी तरुणीला नागपूर येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले होते.
तरुणीवर अत्याचार झाला असल्याची शक्यता वैद्यकिय अधिकायांकडून व्यक्त करण्यात आलेली होती.घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश व इतर वरिष्ठ अधिकायांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी दिलेल्या आदेशानूसार स्थानिक गुन्हे शाखा,गडचिरोली व पोस्टे गडचिरोलीची समांतर तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु करण्यात आला होता.
उपचारादरम्यान आज दिनांक, 04/03/2025 रोजी दुपारी सदर तरुणी आपले बयाण देण्यासाठी सक्षम असल्याचे वैद्यकिय अधिकायांकडून प्रमाणित करण्यात आल्यानंतर गडचिरोली पोलीसांकडून सदर तरुणीचे बयाण नोंदवून घेण्यात आले. पिडीत तरुणीच्या बयाणावरुन आरोपीविरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे अप.क्र. 131/2025 कलम 64 (1), 64 (2) (एल), 115 भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बयाणादरम्यान तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरुन आरोपीचे रेखाचित्र पोलीसांकडून तयार करुन घेण्यात आले होते.
सदर रेखाचित्रावरुन पोलीसांनी गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळवत संशयित इसम नामे,अनिल संतू उसेंडी, वय,23 वर्षे,रा.दोबे,ता.ओरच्छा,जि. नारायणपूर (छ.ग.) हल्ली मुक्काम शिवणी ता.व जि. गडचिरोली यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
आरोपीची कसून चौकशी केली असता,आरोपीने सदर गुन्हा केल्याचे पोलीसांसमक्ष कबूल केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री.विशाल नागरगोजे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांचे मार्गदर्शनात प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री.विशाल नागरगोजे, स्था.गु.शा. गडचिरोलीच पो.नि. अरुण फेगडे, पोस्टे गडचिरोलीचे पोनि. रेवचंद सिंगनजुडे,पोस्टे गडचिरोली व स्था.गु.शा.चे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी आश्वासन दिले आहे की, सदर प्रकारच्या गंभीर गुन्ह्रांमध्ये आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करुन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशिल राहिल.