ब्रम्हपुरी - नागभीड रस्त्यावरील पोदार स्कुलजवळ ट्रॅव्हल्स व हायवा ट्रक मध्ये समोरासमोर भीषण धडक ; 2 जण गंभीर जखमी तर 13 जण किरकोळ जखमी.
📍प्रवाशी मिळाले पाहिजे म्हणून ट्रॅव्हल्स चालक प्रचंड वेगाने चालवत असल्यामुळे घटना घडली.
एस.के.24 तास
नागभीड : प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत 2 जण गंभीर जखमी तर 13 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सोमवार 27 मार्च रोजी दुपारी 4:00 वा.च्या सुमारास ब्रम्हपूरी नागभीड रस्त्यावरील पोदार स्कुलजवळ घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर वरून ब्रम्हपूरी च्या दिशेने (MH.49 AT 3030) या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलस येत होती.या ट्रॅव्हल्स मध्ये 30 ते 35 प्रवासी होते.ही ट्रॅव्हल्स चालक प्रचंड वेगाने चालवत होता.तेव्हा ब्रम्हपूरी - नागभीड रस्त्यावरील पोद्दार स्कुलपर्यंत ही ट्रॅव्हल्स पोहचली तेव्हा ब्रम्हपूरी कडुन नागभीड च्या दिशेने (MH.40 CT 5690) या क्रमांकाचा हायवा ट्रक जात होता.
अचानक या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.धडक इतकी भीषण होती की या धडकेत दोन्ही वाहनांचा समोरील भाग चेंदामेंदा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपूरी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना ब्रम्हपूरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
व गंभीर जखमींना ब्रम्हपूरीतील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.यात ट्रक चालक आदीत्य विशाल ठाकरे वय, 24 वर्ष रा.मोहाडी ता.नागभीड हे गंभीर जखमी झाले आहेत.तर ट्रक मधील क्लिनर कुणाल मडावी वय, 30 वर्ष रा.नागभीड किरकोळ जखमी आहे.
तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स मधील गुड्डु गणपत धोंगडे वय,37 वर्ष,जितेंद्र गेडाम वय,34 वर्ष रा.कुनघाडा चक ता.नागभीड,मुस्कान असल्म पठाण वय,25 वर्ष रा.नागभीड,दिपीका विनोद मत्ते वय, 29 वर्ष रा.वर्धा,अजमल असल्म खा पठाण वय, 35 वर्ष रा.नागभीड,चंद्रकला वामन ढोके वय,70 वर्ष रा.नागपुर, एकनाथ वामन गजभिये वय, 40 वर्ष रा.बाम्हणी तह.चिमुर
कमल भास्कर ईलकटकल वय,74 वर्ष रा.इंदीरानगर नागपूर, सचिन वामन ढोके वय,32 वर्ष रा.नागपुर,पवन मधुकर उराडे वय,34 वर्ष रा.चिमुर, सुनंदा भास्कर लोखंडे वय, 29 वर्ष रा.रूई ता.ब्रम्हपुरी, निशांत सुखदेव मेश्राम वय,39 वर्ष रा.मुल अशी जखमींची नावे आहेत.