2 चकमकीत 1 जवान आणि 23 माओवादी ठार ; सुरक्षा दलाची मोठी कारवाई.

2 चकमकीत 1 जवान आणि 23 माओवादी ठार ; सुरक्षा दलाची मोठी कारवाई.


एस.के.24 तास


दंतेवाडा : छत्तीसगडमधील बस्तर भागात गुरुवारी झालेल्या दोन चकमकीत एक जवान आणि 23 माओवादी ठार झाले आहेत.दंतेवाडा सीमेजवळील विजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात माओवादी असल्याची माहिती मिळाली होती. याआधारे सुरक्षा दलांनी सकाळी 7:00 वा.कारवाई सुरू केली तेव्हा पहिली चकमक झाली.

बस्तर रेंजचे आयजीपी सुंदरराज पी यांनी सांगितले की, दांतेवाडाच्या सीमेजवळ बिजापूर जिल्हातील गंगालूर ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जंगल परिसरात माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमदरम्यान सकाळी सात वाजता चकमक सुरू झाली. अनेक तास अधूनमधून गोळीबार सुरू होता.

“ गोळीबारात विजापूर जिल्हा रिझर्व्ह गार्डचा (डीआरजी) एक जवान शहीद झाला आहे.18 माओवादी मारले गेले आहेत. आम्ही स्फोटके आणि शस्त्रे जप्त केली आहेत. शोध मोहीम सुरू आहे, ” असे अधिकाऱ्याने पुढे बोलताना सांगितले.

बस्तर भागातील नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या एका चकमकीत चार माओवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या भागात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली.

 कांकेर जिल्ह्यातील डीआरजी आणि बीएसएफ च्या संयुक्त दलांना मोहिमेसाठी रवाना झाले होते, अशी माहिती असे कांकेर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आय कल्याण एलेसेला यांनी दिली.

छोटेबेठिया पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या कोरोस्कोडो गावाजवळ ही चकमक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.गोळीबारात ठार झालेल्या चार माओवाद्यांकडून एक ऑटोमॅटिक रायफल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान दुसऱ्या एका घटनेत नारायणपूर जिल्ह्यातील अबुझामदच्या जंगलात सुरक्षा दलाकडून कारवाई केली जात असताना पहाटे 3:00 वा.काही बंडखोरांनी आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे 1 जवान आणि एका अधिकार्‍याच्या डोळ्यात धूळ गेली. दोघांनाही बाहेर काढण्यात आले आणि ते सुरक्षित आहेत,असे एका अधिकाऱ्याने सांगितले.तसेच ही मोहिम अजूनही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

वर्षात आत्तापर्यंत 105 माओवादी ठार : - 

या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या विविध चकमकींमध्ये सुमारे 105 माओवादी मारले गेले आहेत. ज्यामध्ये बस्तर भागातील 69 माओवादींचा समावेश आहे. तसेच या मोहिम दरम्यान एकूण 13 जवान आणि 16 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !