जिथे होती सरपंच बाई !! तिथे नवरा केला लाच घेण्याची घाई !! आला पतीदेव एसीबीच्या कचाट्यात...
★ सरपंच पतीने एका व्यक्तीला ग्रा.पं. रेकॉर्डला बक्षीस पत्राची नोंद करण्याच्या कामासाठी 1000 / - रक्कम स्वीकारताच त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक.
एस.के.24 तास
अकोला : जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील सालतवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पतीने गावातीलच एका व्यक्तीला ग्रामपंचायत रेकॉर्डला बक्षीस पत्राची नोंद करण्याच्या कामासाठी 1000 रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याने तो अकोला एसीबीच्या हाती लागला.
यातील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली.असता सत्यता आढळून आल्याने आज दिनांक,26/02/2025 व दिनांक,28/02/2025 रोजी सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती.आज सायंकाळी आरोपी सरपंच पती देवानंद गणपत जामनिक वय,57 वर्ष, व्यवसाय शेतमजुरी उमई, ता.मुर्तिजापुर जि.अकोला (खाजगी इसम) यांस तक्रारदारा कडून पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, यातील तकारदार यांनी दिनांक 26/02/2025 रोजी एसीबी कार्यालय अकोला येथे तकार दिली की,तक्रारदार यांच्या वडिलांनी त्यांच्या नावे ग्राम सालतवाडा ता.मुर्तिजापुर जि.अकोला येथील विटा सिमेंटचे पक्के बांधकाम केलेले घर बक्षीसपत्रान्वये तकारदार यांचे नावावर केले आहे.
सदर बक्षीस पत्राची नोंद ग्राम पंचायत अभिलेखावर होवुन घराचा नमुना ८ अ मिळणेकामी तकारदार यांनी सदर बक्षीसपत्राची एक झेरॉक्सप्रत सालतवाडा गट ग्रामपंचायत येथे दिलेली आहे.
गट ग्रामपंचायत सालतवाडा येथील महीला सरपंच सौ.सिमा देवानंद जामनिक यांचे सर्व काम त्यांचा पती गैरअर्जदार देवानंद जामनिक पाहत असल्याने तकारदार हे सरपंच पती गैरअर्जदार देवानंद जामनिक याला भेटले व सदर बक्षिसपत्राची नोंद ग्रामपंचायत अभिलेखावर करून घराचा नमुना 8 (अ) देण्यास विनंती केली. त्यावर सरपंच पती देवानंद जामनिक याने तक्रारदारला 3,000 रूपये लाच रकमेची मागणी करीत आहेत अशा आशयाची तकारदार दिली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक,26/02/2025 रोजी आंबेडकर चौक, एस.टी. स्टॅन्ड, मुर्तिजापुर येथे शासकिय पंचासमक्ष पडताळणी कार्यवाही केली.
असता, गैरअर्जदार देवानंद जामनिक याने बक्षीसपत्राची नोंद ग्रामपंचायत अभिलेखावर करून घराचा नमुना ८ अ देण्याकरीता सरपंच पती गैरअर्जदार देवानंद जामनिक याने तडजोडी नंतर 1,000 रूपये लाच मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
दि.27/02/2025 रोजी शासकिय पंचासमक्ष आंबेडकर चौक,एस.टी. स्टॅन्ड,मुर्तिजापुर येथे सापळा कार्यवाही आयोजीत केली असता ग्राम सालतवाडा गट ग्रामपंचायतच्या महिला सरपंच यांचे पती गैरअर्जदार देवानंद जामनिक तकारदार
यांच्या कडुन 1,00० रूपये लाच रक्कम स्विकारल्याने अकोला येथील एसीबीच्या अधिकाऱ्याऱ्यांनी सापळा कार्यवाही करून नमुद आरोपी देवानंद जामनिक (खाजगी इसम) यास ताब्यात घेवुन त्याचेविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे पोलीस स्टेशन मुर्तिजापुर शहर जि.अकोला येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
सदरहू कारवाई अकोला एसीबीचे पोलिस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन सावंत व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार डिगांबर जाधव, किशोर पवार, प्रदिप गावंडे,अभय बावस्कर, निलेश शेगोकार,श्रीकृष्ण पळसपगार,चालक पो.हवा.सलिम खान यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.