कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग दरम्यान रवीश मधुमटके पोलीस जवानांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
एस.के.24 तास
भामरागड : गडचिरोली विशेष कृती दल / SAG येथे कार्यरत असणारे पोशी / ३८११ मृतक शिपाई रवीश राजू मधुमटके वय,34 वर्षे रा.गोकुलनगर वार्ड क्र.23 जि.गडचिरोली यांचा काल संध्याकाळी 7:00 वा.च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी ते आपल्या पथकासोबत रवाना झाले होते. यादरम्यान पोलीस स्टेशन कोठीपासून 5 कि.मी चालल्यानंतर,त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली.
असता त्यांना तात्काळ भामरागड येथील ग्रामीण आरोग्य केंद्र/आरएचसी येथे हलवण्यात आले होते, मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले होते.
त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. आज रोजी त्यांचा अंत्यविधी गडचिरोली येथिल कठानी नदी घाटावर होणार आहे.त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी,आई,वडील 3 वर्षीय मुलगी आहे.त्याचे वडील नगर परिषद गडचिरोली येथे कार्यरत आहेत.
त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. आज त्यांचा अंत्यविधी गडचिरोली येथे होणार आहे.