देशाचे संविधान हा देशाचा सर्वोच्च ग्रंथ भारतीय संविधान महोत्सव. - प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : १७/०२/२५ " अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.यानंतर देशाचे संविधान दोन वर्षं अकरा महिने अठरा दिवस रात्र न् दिवस एक करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले.स्वातंत्र्य,समता,बंधूता व न्यायावर आधारीत हा संविधान ग्रंथ देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे.
" असे बहुमोल विवेचन प्राचार्य डॉ.डी.एच गहाणें नी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील ग्रंथालयात भारतीय संविधान महोत्सवानिमित्त संविधानावर आधारीत पुस्तक प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी ग्रंथालयाचे प्रभारी सुषमा राऊत,अध्यक्ष डॉ.युवराज मेश्राम,डॉ.धनराज खानोरकर, डॉ.मोहन कापगते,डॉ.मिलिंद पठाडे,डॉ.वर्षा चंदनशिवे,डॉ.प्रकाश वट्टी,प्रा बालाजी दमकोंडवार,निनावे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ.मिलिंद पठाडे व आभार डॉ.वर्षा चंदनशिवेनी मानले.यशस्वीतेसाठी ग्रंथालयशास्त्र समितीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.