गाडगे बाबा स्वच्छता व समतेचे पुजारी. - डॉ.सुभाष शेकोकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२३/०२/२५ " समाजसंत गाडगे बाबानी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य डोंगरासारखे केले.शिक्षण, आरोग्य,समतेवर जोर देत समाज सुधारण्यासाठी ते अहोरात्र झटले.कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली.मानवता,स्वच्छता व समतेचे ते पुजारी होते "
असे विचार नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी मांडले,ते संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त महाविद्यालयात बोलत होते. कार्यक्रम प्राचार्य डॉ डी एच गहाणेंच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या प्रसंगी सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले गेले.डाॅ.राजेंद्र डांगे,डॉ.रेखा मेश्राम,डॉ धनराज खानोरकर,डॉ युवराज मेश्राम,अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ.वर्षा चंदनशिवे,डॉ.अजित खाजगीवाले
डॉ.पद्माकर वानखडे,डॉ.मिलिंद पठाडे,प्रा.बालाजी दमकोंडवार,प्रा.धिरज आतला,पर्यवेक्षक प्रा. आनंद भोयर,गायगवळी,रुपेश चामलाटे,प्रज्ञा मेश्राम,मोरेश्वर हटवार,विलास खोब्रागडे इत्यादींनी पुष्प वाहून महाराजांना विनम्र अभिवादन केले.
संचालन व आभार समितीचे डॉ.धनराज खानोरकरांनी केले.यशस्वीतेसाठी समिती सदस्य व प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.