जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अ-हेरनवरगांव येथे आनंद मेळावा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी - १५/०२/२५ शिक्षण घेता घेता कमवा हीच आयुष्याची खरी कमाई.प्राथमिक शाळेतील शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनण्याच्या उद्देशाने आणि भविष्यात सुशिक्षित बेरोजगार न राहता विद्यार्थ्यांनी लहान - मोठा व्यवसाय करावा या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवानंद तुलकाने यांनी आनंद मेळाव्याचे आयोजन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचे टाल्स लावून करण्यात आले.
या आनंद मेळाव्याच्या अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सुप्रिया ढोक यांनी सदस्य धर्मा जराते, संजय जराते, सोनू चहांदे व अन्य सभासदांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीत मेळाव्यांचे उद्घाटन केले.
उद्घाटन होताच विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या टाल्स चे निरीक्षण करून खाद्यपदार्थ विकत घेऊन त्यांची चव घेतली आणि त्यांना हीच आयुष्याची खरी कमाई आहे असे दिशा निर्देश दिले.भविष्यात असेच मोठे व्यवसाय करून मालक बनुन रोजगार द्यावा व गोरगरिबांना उदरनिर्वाह करण्यास सहकार्य करण्याचा सल्ला यावेळी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पाथोडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निकुरे मॅडम व शिक्षिका, शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.