अड्याळ(जाणी) येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा समारोप.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०४/०२/२५ डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स,ब्रह्मपुरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे अड्याळ (जाणी) या दत्तक गावी 'युथ फॉर माय भारत' या संकल्पनेवर आधारीत "आरोग्यदायी, पर्यावरण आणि डिजिटल साक्षरतेकरीता युवाशक्ती" या विषयांवर आधारीत सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन २७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करण्यात आले होते.
या शिबिराच्या समारोपीय सोहळ्याला अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था, चांदा (ब्रह्मपुरी) चे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेश कांबळे हे उपस्थित होते.
त्यांनी अड्याळ गाव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जपणारे एक आदर्श गांव असून या गावाच्या संपूर्ण विकासासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमातून गावातील सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जे परिश्रम केले.
त्याबद्दल संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे आभार मानले. यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रा.डि.के.मेश्राम, यांनी एन.एस.एस हे सामाजीक विकास व मूल्यशिक्षण घडवून आणणारे खरे व्यासपीठ आहे, त्यामुळे प्रत्येक स्वयंसेवकाने ही आपली नैतिक जबाबदारी समजुन सतत सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत राहावे असे विचार मांडले .
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मान.श्री.प्रभाकर सेलोकर, यांनी अड्याळ गावातील एकंदरीत सामाजीक वातावरण पोषक असल्याने इथे एनएसएस स्वयंसेवकांना काम करण्याची चांगली संधी मिळाली आहे त्यामुळे दरवर्षी येथे वेगवेगळे विकासात्मक उपक्रम राबविण्यात यावे असे प्रतिपादन केले.
तंटामुक्ती अध्यक्ष श्री.विनोद वासनिक यांनी सुध्दा स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमामूळे गावातील सामाजीक, आर्थिक,आरोग्य,शैक्षणिक व सांस्कृतिक विकासामध्ये भर पाडली याबद्दल समाधान व्यक्त केले.या प्रसंगी व्यासपीठावर अड्याळ येथील सरपंचा सौ.ताराबाई गाडेकर, उपसरपंच श्री.नामदेव लांजेवार . जि. प.उच्च.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री. बळीरामजी लांजेवार, श्री.चौरे सर तसेच ग्रामपंचायत सदस्य राजेश्वर गेडाम,किशोर राऊत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिबिरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. ज्यामध्ये डिजिटल साक्षरता, जलसाक्षरता आणि पर्यावरण, व्यसनमुक्ती व व्यक्तिमत्व विकास , महिला आरोग्य व लैंगिक शिक्षण, एड्स जनजागृती करण्यासाठी पोस्टर स्पर्धा,आरोग्य शिबिर, संविधान रॅली, हर घर तिरंगा रॅली, पर्यावरण बचाव रॅली काढून पथनाट्याच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजीक व सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या उत्कृष्ट स्वयंसेवकांना व जि.प.उ.प्रा. शाळा,अड्याळच्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.महाविद्यालयाच्या रा.से.यो विभागातर्फे जि.प.उ.प्रा.शाळा, अड्याळला संविधानाची उद्देशिका तथ भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट स्वरूप म्हणून देण्यात आली.
या समारोपीय सोहळ्याच्या शिबिराचे अहवाल वाचन प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे मॅडम यांनी व बक्षीस वितरणाचे संचालन प्रा.राजेश कोसे, रा.से.यो कार्यक्रम अधिकारी यांनी केले. सूत्रसंचालन आदित्य बोरकर याने व तर तर आभार यश शेंडे याने केले.
शिबिराच्या यशस्वीतेकरीता महाविद्यालयाचे सचिव व प्राचार्य डॉ.देवेश कांबळे, सर्व प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी, जि.प.उच्च.प्रा.शाळेचे सर्व शिक्षकवृंद, श्री. संजय हटवार, सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी, श्री.पी.एल.भोयर, अड्याळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटांच्या पदाधिकारी तसेच समस्त गावकरी मंडळी यांनी फार अथक परिश्रम घेतले.