रेती माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला,रेत्ती माफियांची वाढली मुजोरी यांना कुणाचा आशीर्वाद.
★ रेती माफिया व्यापारी असो.चा अध्यक्ष व भाजपचा पदाधिकारी.
एस.के.24 तास
राजुरा : विरूर स्टेशन येथील सारडा कॉम्प्लेक्स येथे व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत व्यापारी या नात्याने माझे मोठे भाऊ रामावतार सोनी 52 वर्षे,व मी (ललितकुमार सोनी) त्याठिकाणी उपस्थित होतो.त्यात मी (ललितकुमार सोनी) पत्रकार हि आहे. त्याच सोबत मी विरूर स्टेशन व्हाट्सअप ग्रुप चा एडमिन हि आहे.दि. 02 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान व्यापारी संघटनेच्या शाळा कॉम्प्लेक्स गोदाम येथील बैठकीत हजर असतांना
सतीश लक्ष्मणराव कोमरवेल्लीवार वय,63 वर्ष
प्रकाश लक्ष्मणराव कोमरवेल्लीवार वय,54 वर्ष
रुपेश सतीश कोमरवेल्लीवार वय,36 वर्ष
सचिन सतीश कोमरवेल्लीवार वय,35 वर्ष
दिनेश सतीश कोमरवेल्लीवार वय,33 वर्ष
सर्व राहणार विरूर स्टेशन हे आमचे जवळ येऊन मला व माझे मोठे भाऊ राम अवतार सोनी याना म्हणाले कि, तुम्ही दोघे पत्रकार असून नेहमी रेती तस्करीवाल्यांना त्रास देता व पोलीस कंट्रोल रूम, एसपी ऑफीस येथे नेहमी फोन करून माहिती देत असता. तसेच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमाने सोशल मीडियावर अवैधरित्या तस्करी ची माहिती प्रसारित करीत असतात.
त्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालय खनिज विभाग यांना पत्रव्यवहार करून वारंवार माहिती का देता असे ओरडत सतीश कोमरवेल्लीवार यांनी आमचे सोबत भांडणाला सुरुवात केली. भांडणाची स्वरूप बाचाबाचीत व नंतर हाणामारीवर आले.सतीश, सचिन, दिनेश, प्रकाश, रुपेश यांनी मला व माझे मोठे भाऊ राम अवतार सोनी यांना लाता बुक्क्यांनी व हातातील कड्यांनी मारहाण केली.
मारहाणीत माझ्या उजव्या नाकाजवळ,पाठीवर व कपाळावर मार लागण. तसेच माझे मोठे भाऊ रामावतार सोनी यांच्या डाव्या हाताचे पंजावर पोटाचे खाली मार लागल्याने दात हालत आहे. पोलिसाला फोन लावत असताना मोबाईल हिसकावत मोबाईल फेकून दिला.
त्यावेळेस त्या ठिकाणी हजर असलेले पोलीस हवालदार विजय मुंडे यांनी गैर अर्जदारांना मारहाण करताना तीनदा समजावण्याच्या व झगडा भांडण मिटवण्याच्या प्रयत्न केला परंतु ते कोणाचीही न ऐकता आम्हा दोघा भावांना अश्लील वाईट वाईट शब्दात शिवीगाळ करत मारहाण करीत होते. कोमरवेल्लीवार कुटुंबीयांनी आम्हा दोघा भावांना जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट देण्याकरिता जात असताना तुम्ही बाहेर कसे येता म्हणत आम्हाला पोलीस स्टेशनला येण्यास अडवून ठेवले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक उल्लेवार व इतर पोलीस कर्मचारी यांनी आम्हाला संरक्षण देत पोलीस स्टेशन ला आणले.
याबाबत रीतसर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीतांविरुद्ध बीएनएस 2023 कलम 115(2), 189(2), 189(3), 190, 191(2), 296(a), 324(4), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत सुद्धा यात शामिल करावी अशीही मागणी विरूर प्रेस असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे.
सतीश कोमरवेल्लीवार हे भाजपचे मोठे पदाधिकारी असून त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजुरा तालुक्यातील वर्धा नदी च्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु असून रेती माफियांना राजकारण्यांचा व शासकीय अधिकाऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त आहे.
याविरोधात व्हाट्सएपवर माहिती अथवा बातमी प्रसारित केल्यास रेत माफिया खवळतात, त्याच अनुषंगाने शासकीय कर्मचारी, पत्रकार व जागरूक नागरिकांसोबत मारपिटी करून त्यांना दडपण्याचा हा प्रयत्न असून आपण पत्रकार या नात्याने आपण आपल्या लोकप्रिय वर्तमान पत्र, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया व डिजिटल मीडियाच्या माध्यमाने बातमी प्रकाशित करून न्याय मिळवून द्यावा हि विनंती.