प्रा.राजेंद्र जी कराडे यांची आदर्श ग्राम कळमना येथे भेट. - सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या लोकाभिमुख उपक्रमांचे केले कौतुक
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : महाराष्ट्र सरपंच संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. राजेंद्र कराडे, विदर्भ अध्यक्ष अँड. देवा पाचभाई आणि चंद्रपूर तालुक्यातील सरपंचांच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायत कळमना येथे भेट देऊन संपुर्ण गावाची आणि येथील उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या प्रयत्नाने पुर्णत्वास आलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांची पाहणी केली.
अतिशय सुंदर आणि मनमोहक तितकेच लोकाभिमुख उपक्रम पाहून ते सर्व भारावून गेलेत. कळमना हे गाव इतके स्वच्छ सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पूरक केले याचे समाधान व्यक्त केले. आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांची समाजाप्रती जुळून असलेली नाळ व त्यातून त्यांनी केलेली वाखाणण्याजोगी कामगिरी बघुन कळमना हे गाव जिल्ह्यातील आदर्श ग्राम नाही तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावेल अशी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी महाराष्ट्र सरपंच संघटनेच्या चंद्रपूर तालुकाध्यक्ष संध्या पाटील, चेकनिंबाळा च्या सरपंच अनिता पिदुरकर, वायगावचे सरपंच शंकर सुरतेकर, मोरवा सरपंच स्नेहा तेलंग, बेलसनी चे सरपंच इंदिरा पोडे, कोसारा सरपंच कृतिका नरुले, छोटा नागपूर चे सरपंच चित्रलेखा गंधफाडे, सरपंच रंजना मडावी, सरपंच पपीता आत्राम आदी मान्यवर शिष्टमंडळात उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे राजुरा तालुक्यातील मौजा कळमना हे गाव पंचक्रोशीतील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे गाव म्हणून नावलौकिक प्राप्त आहे. येथे स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि पर्यावरण पूरक गाव करण्यासाठी उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांनी विविध शासकीय योजनेच्या लाभातून तसेच जनसहभागातून अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत.
गावातील प्रवेशद्वारावर समाजसेवक प्रथम सरपंच नागोबा पाटील वाढई यांचे स्मारक, दोन्ही मुख्य चौकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुर्णाकृती पुतळे, मुलांना अभ्यास करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, स्मशानभूमीत आकसिजन पार्क उभारले असून येथे विविध फुल झाडे, फळ झाडे व गुलाबी बाग फुलवली आहे, जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी पार्क,
रस्त्याच्या दुतर्फा बोलक्या भिंती, ठिकठिकाणी सिमेंट बेंचेस, जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावात सी टी व्हि कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचे लाईव्ह टेलिकास्ट एलीडी लाऊन मुख्य चौकात करण्यात येते, जिल्हा परिषद शाळेला सुद्धा स्वच्छ, सुंदर आणि मार्डन शाळा करण्यात आले आहे. गावातील गटारे बंदिस्त केले असून सार्वजनिक शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत. शासकीय इमारतीवर व जलवाहिनी च्या विहिरी वर ऑन ग्रिड व ऑफ ग्रिड सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत.
ग्राम पंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सर्व आय एस ओ नामांकन प्राप्त आहेत. जुन्या टाकाऊ सायकल, बैलबडी चाकापासुन, पाणी बाटल्या पासून, जुन्या घरेलु कवलापासुन सुंदर सेल्फी पाईट उभारले आहे. गावात पोलवरती मोठ मोठे पथदिवे लावण्यात आले आहेत, रस्त्या च्या दुतर्फा, विखुरलेल्या जागेवर ७ हजार वुक्ष लागवड केली आहे. गावात नाल्याचे खोलीकरण, त्याच बरोबर अनेक चेक डाम व मोठा कोल्हापुरी गजेट बंधारा बांधला आहे. अशी अनेक विकासकामे येथे पहायला मिळत आहेत.
कळमना येथे महाराष्ट्र सरपंच संघटनेचे शिष्टमंडळ भेट देऊन पाहणी करताना येथील उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई, उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रामपंचायत सदस्य रंजना पिंगे, सुनीता उमाटे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेव ताजणे,उपाध्यक्ष विठ्ठल वाढई, कार्यकर्ते कवडु पिंगे, सुभाष वाढई, महादेव आंबिलकर, मदन वाढई, कवडु मुठलकर, सुरेश मुठलकर, श्रावण गेडाम, शामराव चापले, नत्थु वसाके, ज्ञानेश्वर ताजने, गयाबाई गेडाम, शोभा गेडाम, शोभा आत्राम, नाजुका आत्राम, मिनाताई क्षिरसागर यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.