नंदकिशोर वाढई एक ध्येयवेडा आदर्श सरपंच ; सांस्कृतिक कार्यक्रमात गावकऱ्यांसह स्वतः सहभागी केले विद्यार्थ्यांना प्रोत्साहित.
राजेंद्र वाढई : उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना गाव हे पंचक्रोशीतील एक आदर्श गाव म्हणून ओळख असलेले गाव असून येथील सरपंच नंदकिशोर वाढई एक उपक्रमशील स्मार्ट सरपंच म्हणून नावलौकिक प्राप्त आहेत. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन गावकऱ्यांच्या सहभागातून गावांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केले असून अनेक महत्त्वाकांक्षी योजना ते येथे राबवित आहेत.
यात आता त्यांनी नवीन आणि अभिनव उपक्रम हाती घेत चक्क गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गावातील आपल्या काही निवडक सहकाऱ्यांना सोबत घेऊन लोकनृत्य करीत शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आहे.एक ध्येयवेडा सरपंच गावाच्या प्रगतीसाठी अशा प्रकारे स्वतः सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थी, गावकरी यांना प्रेरीत करीत असल्याने सर्वत्र त्यांच्या उपक्रमांची व कार्याची चर्चा होतांना दिसून येत आहे.
कळमना येथे शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, ग्रामसेवक सिताराम मरापे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेव ताजणे, सचिव दत्ताजी पिंपळशेंडे, कार्यकर्ते विठ्ठल वाढई, शामराव अटकारे, सुरेश मुठलकर, मारोती अटकारे आदी नागरिकांनी अतिशय सुंदर लोकनृत्य सादर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
यावेळी कळमनाचे उपसरपंच कौशल्या कावळे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, मुख्याध्यापिका दूधे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजना पिंगे, शिक्षक दिलीप निमकर, शालीक पेंदोर, वनिता गौखरे, ग्रा. प. सदस्य साईनाथ पिंपळसेंडे, सुनिता ऋषी उमाटे, हनुमान मंदिर कमिटी अध्यक्ष प्रभाकर साळवे, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी कळमना येथे जिल्हा परिषद शाळा स्वच्छ, सुंदर, निर्मळ, मार्डन शाळा, बंदिस्त गटारे, रस्त्याच्या दुतर्फा हिरवी झाडे, गावात सी.सी.टी.व्हि कॅमेरे बसवून त्याचे लाईव्ह टेलिकास्ट एलीडीवर मुख्य चौकात करणे, सर्व शासकीय इमारतीवर व पाणी पुरवठा विहिरी वर ऑन ग्रिड व ऑफ ग्रिड सोलर पॅनल, अंगणवाडीला ISO नामांकन,स्मशानभूमीत सुसज्ज आकसिजन पार्क, टाकावू पासून टिकाऊ वस्तूंचा वापर, अशा अनेक मुलभूत सुविधा निर्माण करून गाव आदर्श बनविले आहे हे विशेष.