जाम तुकुम येथे " शासन आपल्या दारी " एक दिवसीय शिबिर संपन्न.
कमलाकर बुरांडे - प्रतिनिधी
पोंभूर्णा : दि.२५ - २- २०२५ रोजी मौजा जाम तुकुम केवट समाज सभागृह येथे शेतकरीवर्ग ,कामगार व इतर लभार्त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन रांगेत उभे राहून पूर्ण दिवस जाऊ नये त्यांची पायपीट थांबावी तसेच विविध योजनांचा लाभ घेता यावा याकरिता उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल विभागांतर्गत शासन आपल्या दारी हा एक दिवसीय उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रमामध्ये राशन कार्ड नवीन व नूतनीकरण, अग्रिस्टोक फार्मर आय डी, प्रधानमंत्री किसान योजना, संजयगांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना,शेतीचे भोगवटदार वर्ग २ चे वर्ग १ करणे , वारसान फेरफार, नवीन मतदार नोंदणी,आधार कार्ड इत्यादी अनेक योजना राबविण्यात आल्या व अनेक लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला.
शिबिराचे मुख्य मार्गदर्शक तहसिलदार रेखा वाणी तालुका पोंभूर्णा तसेच नायब तहसीलदार उईके साहेब, नायब तहसीलदार दिपाली आत्राम मॅडम, अन्न पुरवठा अधिकारी गजबे मॅडम
गणवीर साहेब, मंडळ अधिकारी चिडे साहेब,तलाठी भोयर साहेब साझा देवाळा खुर्द, भोयर साहेब तलाठी जामतुकुम, कावळे साहेब साजा बोर्डा बोरकर, प्रशासक अरुण वाकुडकर ग्रा.पं.जाम तूकुम, तेलमासरे साहेब ग्राम पंचायत जामखूर्द, रविभाऊ गेडाम संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभूर्णा आदी उपस्थित होते. शिबिराचे आयोजन मा. सरपंच भालचंद्रजी बोधलकर जाम तुकुम
मा.सरपंच बंडूभाऊ बुरांडे जाम खुर्द, मा. उपसरपंच चींदुजी बुरांडे तसेच शंकर कोसमशिले, देवाजी बुरांडे, विजय देऊरमले, विलासराव गद्देकार, विकास गोवर्धने, गजानन गद्देकार, लक्ष्मी बाई सोमनकार अं.से. शुभम कोहळे, हेमराज बुरांडे, सूरज बुरांडे,भुजंगराव कोवे, रंजीत गेडाम,मधुकर टिकले,सकिंद्र घोंगडे, वसंत सूरजा गडे आदींनी शिबिराच्या यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य केले.