शुल्लक कारणावरून चाकूने गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून भर दिवसा हत्या.
एस.के.24 तास
गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलिस ठाणे जवळच असलेल्या बिबी येथील रामनगर मधील शिवराज पांडुरंग जाधव वय,21 वर्ष या युवकाची शुल्लक कारणावरून चाकूने गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून भर दिवसा हत्या केल्याने एकच खळबळ उडाली.ही घटना गुरुवार दि.6/02/2025 ला दुपारी 12.30 वा.च्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळताच गडचांदूर येथील ठाणेदार शिवाजी कदम सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनेत संपूर्ण परिवार सहभागी असल्याचा आरोप उपस्थित वॉर्डवासीयांनी केला व संपूर्ण परिवाराला हत्या प्रकरणात आरोपी बनवण्याची मागणी केली. हत्या करतात अविनाश पिल्ले ह्याने पोलिसांना समर्पण केले असून दुसरा आरोपी व आई वडील पोलिसांच्या हाती लागले नाही.
आरोपीची पार्श्वभूमी आरोपींवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून वार्डात महिलांना धमकी देणे, चाकू दाखविणे, अश्लील शिवीगाळ करणे व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे असे अनेक आरोप आहे.त्यात आरोपीला त्याच्या आई - वडिलांचे सुद्धा सहकार्य असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांचा आहे.त्यामुळे संपूर्ण परिवाराला येथून स्थानबद्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली.