येवली मंडळात ॲग्रोस्टॅक फार्मर आय.डी.करीता ग्रामपंचायत सभागृहात कॅम्प व जनजागृती.
एस.के.24 तास
गडचिरोली : येवली मंडळात ॲग्रोस्टॅक फार्मर आय.डी. करीता ग्राम पंचायत सभागृहात कॅम्प व जनजागृती सभा आयोजीत करण्यात आले.सभेला सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरीक व गावातील शेतकरी मंडळ अधिकारी व मंडळातील सर्व ग्रामअ, ग्रामसेवक व गावकरी उपस्थीत होते.येवली मंडळात 35% काम प्रलंबीत असून येत्या 8 दिवसात पूर्ण करण्याच्या सुचना चंदु प्रधान नायब तहसिलदार यांनी दिले.
सरपंच श्री.युवराज भांडेकर व श्री चोखाजी बांबोळे ग्राम पंचायत सदस्य यांनी मार्गदर्शन केले की. एक दिवस आड गावात लाऊड स्पीकरवर दंवडी देण्यात येते व शेतक-यांना जाणीव करुन देण्यात येत आहे.गावात चौका चौकात बॅनर लावून प्रसिध्दी करण्याचे ठरले तसेच ग्राम पंचायतीचे कोणतेही प्रमाणपत्र फार्मर आय डी झाल्याशिवाय देण्यात येणार नाही.
जिवन मरनाचा प्रश्न असेल तरच आवश्यकता नुसार देण्यात येईल. रेशन घेतांना सुध्दा प्रसिध्दी करण्यात येईल त्याशिवाय फार्मर आय.डी.होणार नाही असे विवचन केले