अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक, ०७/०२/२५ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील बी.एस्सी तृतीय वर्षाचे आकांशा मेश्राम व निलेश मुखर्जी हे विद्यार्थी आयआयटी खरगपूर येथे पार पडणाऱ्या जागतिक उद्योजकता समिट - २०२५ मध्ये गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या समिटमध्ये जगातील व्हिजनरी आणि इनोव्हेटर सहभागी होणार असून हे समिट ७ फरवरी ते ९ फरवरी २०२५ दरम्यान पश्चिम बंगाल येथील आयआयटी खरगपूर येथे पार पडणार आहे.नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयासाठी ही अतिशय गौरवाची बाब असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे
नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सौ.स्नेहलताबाई भैया,उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया, सचिव अशोक भैया, सदस्य प्रा.जी. एन केला,गौरव भैया,प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,डॉ अतुल येरपुडे, डॉ किशोर नाकतोडे, डॉ रतन मेश्राम, डॉ धनराज खानोरकर,प्रा दलेश परशुरामकर,प्रा रुपेश वाकोडीकर, अधीक्षक संगीता ठाकरे,रोशन डांगे व इतर कर्मचा-यांनी त्यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत