जमा करून ठेवलेली पुंजी गाडगेबाबांनी जनतेच्या शिक्षणासाठी खर्च केली. - प्राचार्य देवेश कांबळे.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२७/०२/२५ ब्रम्हपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा जयंती , मराठी भाषा गौरव दिन व आजी-माजी विद्यार्थी काव्य मैफिल कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य देवेश कांबळे गाडगेबाबा यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,गाडगेबाबांनी स्वतः जमा करून ठेवलेली पुंजी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी खर्च केली आणि शिक्षणाच्या प्रवाहात त्यांच्या मुला, मुलींना ओढून घेतले.
तसेच चांगले व निरोगी आरोग्य रहावे यासाठी गावागावात जाऊन गावातील चौक व रस्ते स्वतः झाडून साफ - सफाई करीत असत आणि कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छता, शिक्षण, निरोगी आरोग्य,प्राण्यांचे बळी न देणे, व्यसनाचे महत्व जनतेला पटवून देत असेही यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अमरदीप लोखंडे, गझलकार मंगेश जनबंधू , कवयित्री सोनाली सहारे, अक्षय खोब्रागडे तर प्राध्यापिका स्निग्धा कांबळे, प्राध्या मेश्राम , प्रमुख अतिथी म्हणून विचार पिठावर उपस्थित होते.
आजी - माजी विद्यार्थी काव्य मैफिल सोहळ्या प्रसंगी महाविद्यालयातील नवोदित कवी म्हणून विद्यार्थी, विद्यार्थिनी भोजराज बावणे,पूर्वी खोब्रागडे,श्रद्धा बनकर,अक्षय खोब्रागडे,प्रज्ञा ठवरे,पायल,पलक रामटेके,सिद्धेश्वर भोयर, मनीषा तलमले,पृथ्वीराज बोरकर,निलेश लाकडे, यांनी खूप सुंदर अशा मनाला वेड लावणाऱ्या कविता सादर केल्या तर गझलकार मंगेश जनबंधू यांनी अप्रतिम गझला सादर करून उपस्थित प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांची मने जिंकली.
अमरदीप लोखंडे,सोनाली सहारे , प्राध्यापिका स्निग्धा कांबळे यांनीही भारदस्त अशा कवितांचे वाचन केले आणि उपस्थितांचे मन एकाग्र ठेवले.प्राध्यापक फुलझेले यांनी विद्रोही कविता सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांच्या अंगात सळसळत्या रक्ताच्या ज्वाला तयार करण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका भीमा डांगे महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्या तुफान अवतळे यांनी बहारदार कवितेने सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.