ने.हि.महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.
अमरदीप लोखंडे : सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२१/०२/२५ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात रयतेचे लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एच गहाणे, डॉ राजेंद्र डांगे व अधीक्षक संगीता ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
या कार्यक्रमाला डॉ रेखा मेश्राम,डॉ.धनराज खानोरकर, डॉ रतन मेश्राम, डॉ.युवराज मेश्राम, डॉ भास्कर लेनगुरे,डॉ सुनिल चौधरी,डॉ वर्षा चंदनशिवे, डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे, डॉ किशोर नाकतोडे, डॉ अरविंद मुंगोले, डॉ अतुल येरपुडे, डॉ विवेक नागभिडकर
प्रा आकाश मेश्राम,प्रा निलिमा रंगारी. प्रा जयेश हजारे,प्रा आनंद भोयर,डॉ ज्योती दुपारे,प्रा प्रियंका उईके ,प्रा वनश्री नाकतोडे ,सुषमा राऊत, दत्तू भागडकर,निनावे, शशिकांत माडे,रोशन डांगे,दुपारेंनी पुष्प वाहून महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी ' छत्रपती शिवाजी महाराज की जय!','भारत माता की जय!' असा जयघोष करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ युवराज मेश्रामांनी केले.यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ.कुलजित शर्मा, डॉ धनराज खानोरकर, डॉ युवराज मेश्राम,प्रा धिरज आतला, जगदिश गुरनुले, प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.