सोमनपल्ली येथिल बस स्टॅंडवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिव्याचा मजकूर पेंटने लिहिलेल्या घटनेचा वंचितने केला निषेध.
★ जातियवादी विकृताला तात्काळ अटक करण्याची जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्याकडे मागणी.
एस.के.24 तास
गडचिरोली : सोमनपल्ली येथिल बस स्टॅंड व आंबोली येथिल शाळेच्या भिंतीवर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक मजकूर लिहीणा-या जातीयवादी विकृत नराधमाचा निषेध व्यक्त करत तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने येथिल ईंदिरा गांधी चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील आंदोलकांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा व जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांची संयुक्त भेट घेऊन घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देऊन तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली.
यावेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी यांनी सांगितले की,या घटनेतील दोषींना अटक करण्यासाठी पोलिसांच्या चार तुकड्या घटनेच्या संदर्भाने तपास करत आहेत,विकृत नराधमाला लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासनही दिले.
यावेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा करतांना बाळू टेंभुर्णे म्हणाले की, आंबेडकरी जनतेच्या भावना दु:खावल्यामूळे जनतेत तिव्र संताप आहे त्यामूळे कोणत्याही प्रकारचा रोष - राग रस्त्यांवर निर्माण होण्याआधी आपण विकृत मानसिकता असलेल्या आरोपीला २४ तासात अटक करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तिव्र आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला.
तिव्र निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ संयोजक बाळू टेंभुर्णे, जेष्ठ नेते जी.के.बारसिंगे,जेष्ठ नेते भरत येरमे, विलास केळझरकर यांनी केले.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तुळशिराम हजारे,युवक आघाडीचे उपाध्यक्ष कवडू दुधे, आजाद समाज पार्टीचे राज बंसोड
भारत रायपूरे,निलम दुधे, कांता भडके, शेषराव तुरे, नामदेव दुधे, नेताजी मेश्राम ज्याती उराडे,लता रामटेके, माला मेश्राम,संघरक्षीत बांबोळे,सतिश दुर्गमवार, भोजूभाऊ रामटेके आदिसहीत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.