वेडली येथे सांस्कृतिक महोत्सव संपन्न.
राजेंद्र वाढई : उपसंपादक
चंद्रपूर : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय वेंडली त. जि.चंद्रपूर येथे दिनांक 31 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिभाताई अलवलवार मॅडम सरपंच ग्रा.पं. वेंडली तर उद्घाटक म्हणून मा. निवासजी कांबळे सर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चंद्रपूर . प्रमुख अतिथी निखिल तांबोळी सर केंद्रप्रमुख पद्मापूर, मनीषा ताई कोरडे सामाजिक कार्यकर्त्या, संस्थेचे पदाधिकारी संजय तोडासे सर, संस्थेच्या सदस्या प्रणाली ताई घुगुल
राजकुमार भाऊ नागपुरे उपसरपंच,संध्याताई पिंपळशेंडे सदस्य ग्रामपंचायत वेंडली संजय पा. टोंगे पोलीस पाटील वेंडली,ग्रामपंचायत सर्व सदस्य गण,श्री.बाबाजी पाटील मुसळे, आनंदराव पिंपळशेंडे अध्यक्ष तंटामुक्त समिती वेंडली जंगलू पा. पाचभाई माजी सदस्य पंचायत समिती चंद्रपूर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत पिंपळशेंडे सर, बेले सर मुख्याध्यापक जि प उच्च प्राथमिक शाळा वेंडली , आदर्श चिवंडे, प्रकाश भाऊ अलवलवार, शैलेश भाऊ पिपरे पोलीस पाटील चोराळा , बबन पाटील पाचभाई सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
संस्थेच्या सदस्या प्रणाली ताई घुगुल यांच्यातर्फे विद्यालयातील प्राविण्य प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या . मनीषाताई कोरडे यांची तर्फे विद्यालयाला विद्यार्थ्यांचे उपयोगी असणाऱ्या भेटवस्तू प्राप्त करून दिल्या. नंदकिशोर टोंगे व संध्याताई पिंपळशेंडे सदस्या ग्रामपंचायत वेंडली यांचे कडून विद्यालयाला थोर पुरुषांच्या प्रतिमा भेट वस्तू म्हणून प्राप्त झाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पिंपळशेंडे सर , सूत्रसंचालन अर्चना ठाकरे मॅडम तर आभार रूपाली तोडासे मॅडम यांनी मांडले. याप्रसंगी गावातील प्रेक्षक गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.