गरिबीशी संघर्ष करणारा इतिहासात नाव करतो. - शरदचंद्र ठेंगरे पाटील
अमरदीप लोखंडे - सहसंपादक .
ब्रम्हपूरी : वर्ग १२ व १० वी परीक्षेचे औचित्य साधून अ-हेरनवरगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावर परीक्षा संबंधाने व पुढील अभ्यासक्रमाच्या वाटा व त्या वाटेने करावयाची वाटचाल याविषयी अ-हेरनवरगांव, परिसरातील पिंपळगांव (भोसले), नांदगाव, भालेश्वर येथील विद्यार्थी -विद्यार्थिनींना मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक शरदचंद्र ठेंगरे पाटील माजी प्राचार्य डायट व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद , गडचिरोली यांनी अजरामर इतिहासात नाव गाजविलेल्या कवी, लेखक, कादंबरीकार, आय ए एस अधिकारी यांच्या गरिबीच्या परिस्थितीचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त करुन परीक्षार्थी विद्यार्थ्यांना इतिहासात चांगली गुणवत्ता प्राप्त करून नाव कोरावे असे आवाहन केले.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सोडवतांना घाबरून न जाता अगदी शांत डोके ठेवून प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचावी आणि त्यानंतर उत्तरे सोडवायला सुरुवात करावी जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही असे मार्मिक मार्गदर्शन दुसरे मार्गदर्शक महल्ले शिक्षक म.वि. पिंपळगाव (भोसले )यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्षस्थानी सतीश ठेंगरे तर प्रमुख अतिथी रतीरामजी चौधरी सचिव ग्रामपंचायत अ-हेरनवरगांव यांनी प्रास्ताविक भाषण केले.तसेच मुन जि. प.शाळा, होमराज राऊत तंटामुक्ती अध्यक्ष ,राहुल कोल्हे,प्रशांत दानी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमरदीप लोखंडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज टेंभूररकर, शरद तलमले, शुभम बडवाईक, विवेक , उरकुडे रजत वैद्य, सुरज मदनकार यांनी मोलाचे सहकार्य केले.