छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही दिशादर्शक. - डॉ.रुपेश मेश्राम
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२०/०२/२५ श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची राज्यकारभाराची नीती आजही समाजासाठी दिशादर्शक आहे असे प्रतिपादन इतिहास विभाग प्रमुख डॉ. रुपेश मेश्राम यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपूरी द्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन तथा मार्गदर्शनपर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ .आर. पी. कांबळे होते.प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. रुपेश मेश्राम यांनी शिवरायांचे स्वराज्य, प्रशासन, न्यायनीती आणि सामाजिक समतेवरील योगदान याविषयी विवेचन केले.
डॉ.आर.पी.कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवरायांच्या विचारांनुसार कृती करण्याचे आवाहन केले. शिवरायांचा इतिहास केवळ गौरवशाली गाथा नसून तो प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेश देतो असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन तथा आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.तुफान अवताडे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.