सिकलसेल आजाराबाबत प्रशिक्षण,सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम,सिकलसेल आजारावर कार्यशाळा.
एस.के.24 तास
वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्र रोहना येथे,सिकलसेल आजाराबाबत सर्व कर्मचाऱ्यांना डॉ.श्रेया डंभारे वैद्यकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली,डॉ.ज्योती सहारे वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविका या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
सिकलसेल आजार अनुवंशिक असून या आजारावर कायमस्वरूपी उपचार असल्याचे आढळून आले नाही. या आजाराने ग्रस्त असलेल्या रोगी व वाहक व्यक्तीवर औषध उपचार करण्यात येत असले तरी या रोगाचा प्रादुर्भाव पुढच्या पिढीमध्ये टाळता यावा यासाठी जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे
सिकल्सेल आजार : - सिकलसेल हा आजार सिकल पेशी रक्तक्षय किंवा डेपनोसायतेसिस या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जणूकामुळे हा आजार होतो. या आजारामध्ये लाल रक्तपेशीचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशीची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिन जणूकाच्या उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशीचा आकार बदलतो. असे रुग्ण अल्पायुषी असतात.
सिकलसेल पेशी आजारामुळे उद्भवणारे विकार :-
1) रक्तक्षय.
2) प्लीहेमधील गुंतागुंत.
3) सिकलसेल्पेशी आजारामुळे रक्तक्षय.
शोध : - या रोगाचे अस्तित्व सर्वप्रथम सन १९१० मध्ये अमेरिकेत सिद्ध झाले. भारतामध्ये सन १९५२ तर विदर्भात सन १९५८ मध्ये सिद्ध झाले.
सिकलसेल आजाराचे प्रकार : -
1) सिकलसेल वाहक.
2) सिकलसेल डिसीज.
सिकलसेल आजाराची लक्षणे : -
रक्तक्षय.अंगात बारीक ताप असणे.लवकर थकवा येणे.कधीकधी सांधेदुखी. फार काम सहन न होणे. शरीरावर हलकीशी सूज येणे,हलक्याशा कामाने श्वासोश्वास वाढणे,प्लीहा वर सूज असणे.डोळे पिवळसर दिसणे.कावीळ होणे.इत्यादी.
सिकल सेल पीडित व्यक्तीसाठी औषध उपचार व समुपदेशन ; डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणी करून घेणे, फॉलिक ऍसिड च्या गोळ्या नियमित घेणे, त्यामुळे लाल रक्तपेशीची निर्मिती होते.डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदना शामक गोळ्या घेणे, जंतू संसर्ग झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करने.
सिकल सेल पीडित व्यक्तीसाठी आहार : पीडित व्यक्तीने हिरवा भाजीपाला जास्त प्रमाणात आहारामध्ये घ्यायला हवा. दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यावे
विवाहपूर्व समुपदेशन : -
विवाहपूर्वी प्रत्येकाने सिकलसेल चाचणी करून घ्यावी.
असे विवाह शक्यतो टाळावे : - दोघेही वाहक असतील तर
एक वाहक व एक पीडित असतील तर,दोघेही पीडित असतील तर
असे विवाह करू शकता : -
सिकलसेल वाहक व्यक्तीने शक्यतो निरोगी व्यक्तीशी लग्न करावे,सिकलसेल ग्रस्त व्यक्तीने शक्यतो निरोगी व्यक्तीशी लग्न करावे.