मोदी व फडणवीस सरकार महिलांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध- प्रा.अतुल देशकर

मोदी व फडणवीस सरकार महिलांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध- प्रा.अतुल देशकर


अमरदीप लोखंडे - सहसंपादक

 

ब्रह्मपुरी - ०५/०२/२५ ब्रह्मपुरी येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने येथील स्थानिक विठ्ठल रुक्मिणी सभागृहात मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा शहर अरविंद नंदुरकर उपस्थित होते. 


संमेलनाचे उद्घाटन भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. वंदनाताई शेंडे यांच्या हस्ते पार पडले. मुख्य वक्ते ॲड. छबुताई गोहोने आणि डॉ. प्रिती सावजी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मंचावर जिल्हा उपाध्यक्ष सौ.रश्मी पेशने, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ मंजिरी राजनकर, शहर अध्यक्ष सौ वर्षा चौधरी, तालुका सौ. शीला गोंदोळे उपस्थित होत्या. 


स्नेहमिलनला संबोधित करताना माजी आमदार प्रा. देशकर यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार महिलांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. महिलांसाठी लाडकी बहीण योजना, एसटी मधे तिकीटात ५०% सूट, मुलींना मोफत शिक्षण या सर्व योजना याचे द्योतक असल्याचे माजी आमदार प्रा. देशकर म्हणाले. 


सोबतच २०२९ पासून लोकसभेत व विधानसभेत ही महिला आरक्षणामुळे महिला लोकप्रतिनिधींना पाठविण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा महिलांचा मोठा सन्मान असल्याचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी सांगितले. 


कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गिताजांभूळे यांनी केले तर मान्यवरांचा परिचय सौ डॉ हेमलता नंदुरकर यांनी केले . प्रास्ताविक सौ रत्ना ताई दंडवते यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ साधनाताई सातपुते यांनी केले. संमेलनाला महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या शेवटी महीलानीं ऊखाने व गीत सादर केले शेवटी हळदी कुंकू व वान देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महीला मोर्चाच्या तसेच भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेत कार्यक्रम पार पाडला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !