कुर्झा जि.प.शाळेत स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ब्रह्मपुरीच्या कुर्झा वार्डातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ने.हि.महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख कवी डॉ धनराज खानोरकर होते तर उद् घाटन माजी नगरसेवक विलास विखारनी केले.उपाध्यक्ष म्हणून डॉ राजेश कांबळे व प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष रिताताई उराडे,मोहनिश उराडे,गोकुल सहारे,किशोर राऊत,तिघरे सर,सुकदेव खेत्रे, प्रकाश बावनकुळे,पिसे, डोर्लीकर , सतिश बावनकुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उद् घाटनानंतर लहान बालकांनी समूह नृत्य,एकल नृत्य,नकला,नाटीका, आदिवासी नृत्य,कोळी नृत्य इत्यादी कलाप्रकारांतून उपस्थितांचे मनोरंजन व प्रबोधन केले.या भरीव कार्यक्रमाचे आयोजन शाळा समितीचे अध्यक्ष सुनिल विखार, उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम, सदस्य विशाल वंजारी,गणेश भानारकर, निर्मला माहोरे
पूजा वैद्य,सरिता बावनकुळे, मुख्याध्यापक हरिदास गोंगले,सौ.बुरडे,तेजल खेत्रे,दिशा सेलोकर,सोनाली बावनकुळे,कामथे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन युवराज वंजारी तर आभार सुनिल विखारनी मानले.