गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा पोलिस स्टेशन येथे कार्यरत केंद्रीय रिजर्व फोर्स दलातील पोलीस जवान यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या.
एस.के.24 तास
धानोरा : धानोरा पोलिस स्टेशन येथे कार्यरत केंद्रीय रिजर्व फोर्स दलातील पोलीस जवान यांनी आज सकाळी दहा वाजता दरम्यान स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक पोलीस जवानाचे का नाव गिरिराज रामनरेश किशोर वय,30 वर्ष आहे.मृतक पोलीस जवान गिरिराज रामनरेश किशोर आग्रा येथील रहिवासी आहेत.
मागील वर्षी आक्टोंबर महिन्यात ते धानोरा पोलीस स्टेशन ला जाईन झाले होते त्यानंतर त्यांना जानेवारी महिन्यात पुणे येथे अटॅचमेंट ड्यूटी वर पाठवल्या गेले होते.ते काल रविवार ला सायंकाळी धानोरा येथे परत आले होते.
आज धानोरा पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 10:00. वाजता जवानाने स्वतःवर बंदुकीतुन गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.त्यांना धानोरा येथील ग्रामीण आरोग्य हॉस्पिटलमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृतक घोषित केले.
पुढील तपास सुरू आहे.सदर पोलीस जवानाने स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या नैराश्यपोटी व ताण तणावातून केल्याचे बोलल्या जात आहे.