गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील एका शेतशिवारात प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या युवतीला जाळून तिची हत्या ; आरोपीला अटक.
एस.के.24 तास
गोंदिया : प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या युवतीला जाळून तिची हत्या केल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील मसगाव ग्रामपंचायत हद्दीतील देऊ तुला शिवारात दि.10/02/2025 रोज सोमवार ला सकाळी 8:00 वा. दरम्यान उघडकीस आली.
पोर्णिमा विनोद नागवंशी वय,18 वर्ष रा.मानेकसा(कालीमाती) पो.ठाना ता.आमगाव असे मृत्तक युवतीचे नाव आहे.
सविस्तर असे की,गोरेगाव शहरापासून काही अंतरावर देऊटोला हे गाव असून शेतमालक दिसेल पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता,त्यांना पळसाच्या झाडाखाली युतीचा मृतदेह जळत असल्याचे दिसून आले.त्यांनी घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली.
ठाणेदार अजय भुसारी यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया येथे पाठविण्यात आला,विशेष म्हणजे, घटनास्थळाशेजारी दुसऱ्या बांधातील तणसाचा ढीग जाळण्यात आला.स्वानपथकाला पाचारण करण्यात आले असता, काहीही साध्य झाले नाही.
यातच पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडाने यांच्या मार्गदर्शनात गोरेगाव पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी तपासाचे चक्र फिरवीत काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले.
खून अनैतिक संबंधातून आरोपी अटकेत : -
पोलिसांनी तपास चक्र फिरवत काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले. अनैतिक संबंधातून गरोदर झाल्यामुळे तिच्या ओढणीने गळा आवळून खून केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. शकील मुस्तफा सिद्दिकी वय,38 रा.मामा चौक गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
मृत तरुणीची ओळख पटली असून ती आरोपीच्या वीट भट्टीवर काम करीत होती.दरम्यान आरोपीने तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती होती.तिने आरोपी सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली असता,आरोपीला ते मान्य नव्हते.तेव्हा तिच्यापासून सुटका करण्याकरिता बबई देऊटोला शिवारात आणून ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने पोलीस तपासात कबूल केले आहे.