कळमना येथे सरपंच,नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते कब्बडी सामन्याचे उद्घाटन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांचा हस्ते कबड्डी सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. कब्बडी हा मैदानी खेळ आपल्या अस्सल मातीचा खेळ असून यातून नव्या पिढीला प्रचंड ऊर्जा मिळते.एकजुट,सांघिक कामगिरी,चपळाई अशा अनेक कौशल्यांचे यातून सर्जन होते.
गावात सर्वांगीण विकासासाठी विविध सर्जन उपक्रमांबरोबरच खेळांनाही प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उद्घाटन प्रसंगी बोलताना आदर्श सरपंच तसेच महाराष्ट्र सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, प्रमुख पाहुणे उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रा. प. सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, दिपक झाडे, सुनीता उमाटे, हनुमान मंदिर कमिटी अध्यक्ष प्रभाकर साळवे, तंटामुक्तीचे अध्यक्ष निलेश वाढई, सुधाकर पिंपळशेंडे, महादेव ताजणे, बंडु विरुटकर, मुख्याध्यापिका दुधे मैडम, शिक्षक दिलीप निमकर, शालीक पेंदोर, वनिता गौखरे मॅडम गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आनंदराव बोढाले
सुरेश गौरकार, सुरेश मुठलकर, मंगेश ताजने, अनिल बोढाले, सुरेश आस्वले, प्रशांत ताजने, पुरुष अटकारे, सुनील बोढाले, भास्कर ताजने, जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन उमाटे, उपाध्यक्ष मारोती टेकाम, सचिव महादेव भोयर, सहसचिव प्रफुल्ल कांबळे, कोषाध्यक्ष सुरज कुकुडे, क्रीडा प्रमुख मोहन आत्राम यासह गावकरी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.