प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव येथे मानसिक आरोग्या शिबिर.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक,27/02/ 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव,आर्वी येथे मानसरोग विषयी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प तसेच शेतकरी समुपदेशक आरोग्य सेवा कार्यक्रम अंतर्गत शिबिर घेण्यात आले.
संबंधित रुग्णांना मोफत औषधी व समुपदेशन करण्यात आले.डॉक्टर पुलकीत मुहरेजा (मानसिक आरोग्य तज्ञ) जिल्हा रुग्णालय वर्धा,सौ.मोनाली मोहुर्ले (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट) रिता थुल (सायकीक सोशल वर्कर) यांनी सर्व संबंधित रुग्णांची तपासणी केली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर निलेंद्र वर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत थोरात,डॉ.श्रीकांत टाले,औषध निर्माण अधिकारी श्री.रोशन सावरकर तसेच आरोग्य सहाय्यक श्री. निलेश महाजन व जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी शिबिराचे यशस्वी आयोजन केले.