शिवराज मालवी व नंदू गुड्डेवार यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा च्या वतीने भद्रावती येथे सत्कार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०३/०२/२०२५ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा भद्रावती द्वारा आयोजित रजत महोत्सव व पदाधिकारी मेळावा स्वागत सेलिब्रेशन हॉल,भद्रावती येथे पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले वणी तालुका मतदार संघातील माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे तसेच विशेष अतिथी सत्कारमूर्ती आमदार करन देवतळे वरोरा - भद्रावती विधानसभा मतदारसंघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य कार्याध्यक्ष निलेश सोमानी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे,
राजेश भांडारकर तहसीलदार भद्रावती, आशुतोष सपकाळ सर्वंग विकास अधिकारी ,पंचायत समिती भद्रावती, तैलीक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्रह्मपुरी येथील नवभारत चे पत्रकार , नेवजाबाई हितकारणी विद्यालयातुन सेवानिवृत्त झालेले पर्यवेक्षक शिवराज मालवी यांना राष्ट्रीय स्तरावर ख्यातीचा जलतरणपटू म्हणून तालुक्याचा नावलौकिक केल्याबद्दल...
तसेच नंदू जी गुड्डेवार वार्ताहर लोकशाही वार्ता यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा , ब्रम्हपुरी चे सचिव म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आणि ब्रम्हपूरी परिसरातील अपघातग्रस्त, अपघातग्रस्तांना उपचाराकरिता तात्काळ मदत पुरविण्यासाठी मग ती आर्थिक ,रक्तपुरवठा, वैद्यकीय तपासण्या बाहेर ठिकाणावरून येणाऱ्या गरजूंना राहण्याची सोय
त्यांची आपुलकीने चौकशी करुन मदत,उपाय योजना करण्यासाठी व अन्य क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी ब्रह्मपुरी तालुक्याचे पत्रकार प्राध्यापक संजय लांबे,अमरदीप लोखंडे व अन्य विविध जिल्ह्यातून आलेले पत्रकार उपस्थित होते.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे आप्त व मित्र परिवार यांच्या कडुन कौतुक केल्या जात आहे. आणि सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.