शिवाजी महाराज हा खरा लोकराजा तीन दिवसीय शिवजयंती उत्सव. - इंजि.भाऊ थुटे महाराज
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१९/०२/२५ " महाराष्ट्राला शूरवीर व संतांची थोर परंपरा लाभली आहे.संत ज्ञानेदेव,नामदेव, तुकाराम,तुकडोजी महाराज जसे संत झाले तसे छत्रपती शिवाजी,महात्मा फुले, महात्मा गांधी असे सत् पुरुषही या भूमीने दिले आहेत.
शिवाजीचे स्वातंत्र्य,बंधूता,न्यायाचे राज्य होते.ती खरी लोकशाही होती आणि शिवाजी महाराज खरा लोकराजा होता "असे जाहिर प्रबोधन सप्तखंजेरीवादक भाऊसाहेब थुटे महाराजांनी केले.ते येथील कुर्झा वार्डातील तीन दिवसीय शिवजयंती उत्सवात प्रबोधन कीर्तन कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलासभाऊ विखार, पत्रकार व कवी डॉ धनराज खानोरकर,प्रा मिलिंद सुटले,सुकदेव खेत्रे,सुनिल विखार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी महाराजांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.संचालन सुकदेव खेत्रे तर आभार राजू चिलबुलेनी मानले.यशस्वीतेसाठी मोहन वैद्य,बन्सी कुर्झेकर,कांतू बावनकुळे,देवचंद थोटे, नरेंद्र लाखेंनी परिश्रम घेतले.